नगर: अहमदनगर : प्रिंटींग व्यावसायिकांनी काळ्या फिती बांधून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाम...
नगर:
अहमदनगर : प्रिंटींग व्यावसायिकांनी काळ्या फिती बांधून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. |
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. याचा फटका अनेक छोट्या उद्योगांबरोबरच छपाई व्यवसायीकांनाही बसला आहे. अहमदनगरसह देशातील छपाई व्यवसायिकांनी २२ मार्च हा ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील सर्व प्रिंटींग व्यावसायिकांनी हाताला काळ्या पट्टया बांधून निषेध नोंदविला आहे.
केंद्र सरकारचे चुकीचे आयात निर्यात धोरण, कागद उत्पादकांच्या मनमानीमुळे किंमतीत झालेली भरमसाठ वाढ, कोवीड संकट काळातील मंदी याकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, नियमनाचा अभाव यामुळे छपाई व्यवसायिक हवालदिल झाले आहेत. छोटे व्यावसायिक मोठ्या संकटात आहेत, याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज देशभरातले व्यवसायिकानी लॉकडाऊनच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने काळा दिवस पाळला आहेत.
छपाई क्षेत्रातील सर्वच मटेरियलच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्याने व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे. किंमती स्थिर नसून दिवसेंदिवस किंमती वाढत चालल्या आहेत. कोरोनाच्या संक्रमणामुळे सरकारने निर्बंध लावल्यामुळे लग्नसराईतील व्यवसायही हातून गेला आहे. आता महागाईमुळे ग्राहकही फिरकत नाहीत. अशा अडचणींचा सामना सध्या छपाई क्षेत्रातील व्यवसायिकांना करावा लागत आहे. नगरमधील सर्व मुद्रक व्यवसायिकांनी २२ मार्च रोजी ‘ब्लॅक डे’ पाळला आहे.
सरकाच्या चुकीच्या धोरणांमुळे उपासमारीची वेळ : मेटे
केंद्र सरकारने कोरोनाचे संकट हाताळताना अनेक चुका केल्या आहेत. जनतेच्या मनात भीती निर्माण करून लॉकडाऊन केले गेले. त्यामुळे अनेक छोटे उद्योग आणि व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. आयात – निर्यात धोरणात नको ते बदल केल्यामुळे प्रिंटींग व्यवसायाशी निगडीत कच्चा मालाच्या किंमती प्रचंड भडकल्या आहेत. देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी महागाईदरात मोठी वाढ झाली आहे. अनेक व्यावसायिक कंगाल झाले आहेत. सरकारच्या चुकांची किंमत सामान्य माणसाबरोबरच छोट्या व्यापाऱ्यांना भोगावी लागत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अन्यथा उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असे न्यू तिरंगा प्रिंटींग प्रेसचे संचालक सिद्धीनाथ मेटे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
COMMENTS