प्रतिनिधी शेवगाव : बुधवार दि.१७ मार्च रोजी शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यांमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळे...
प्रतिनिधी शेवगाव : बुधवार दि.१७ मार्च रोजी शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यांमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बालकांचे लैंगिक शोषण, अत्याचार, बालविवाह आदी महत्वाच्या सामजिक विषयांवर जनजागृती करण्याच्या दृष्टीने ग्राम समितीची भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे या सदस्यांसाठी या विशेष कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
श्री.संजय कदम (जिल्हा कार्यक्रम अधिकारी), श्री. एस. जी. पाटील (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी), एस. ए. राशिनकर (परिविक्षा अधिकारी), श्री.वैभव देशमुख (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शितल खिंडे (गट विकास अधिकारी पाथर्डी) ,श्री. महेंद्र दराडे (बाल विकास प्रकल्प अधिकारी पाथर्डी)व श्री. एस.एस.ढाकणे (बाल विकास प्रकल्प अधिकारी शेवगाव) तालुका संरक्षण अधिकारी सचिन जाधव, गोवर्धन वीर यांच्या उपस्थितीत ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य, सचिव, अंगणवाडी सेविका व ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य, पोलिस पाटील, यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षण कार्यशाळा दोन सत्रांमध्ये पार पडली. कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमती श्रद्धा मुसळे यांनी केले . ग्राम बाल संरक्षण समितीची भुमिका व जबाबदारी,बालविवाह प्रतिबंध कायदा, बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याची माहिती आदी विषयावर श्री.सर्जेराव शिरसाठ, श्री. प्रकाश वाघ, श्री. बाळु साळवे (जिल्हा बाल संरक्षण कक्ष ) यांनी मार्गदर्शन केले. तसेच या प्रशिक्षणामध्ये चाइल्ड लाईन हेल्प लाईन नंबर १०९८ ची माहिती देण्यात आली. आभार प्रदर्शन श्रीमती रुपाली वाव्हळ यांनी केले.
COMMENTS