औरंगाबाद : वाढदिवसाचे औचित्य साधून वेगवेगळे स्टंट करणाऱ्या माथेफिरू, टवाळांच्या टोळ्या शहरांमध्ये कायम आढळून येतात. हे फॅड थेट ग्रामीण भागा...
औरंगाबाद :
वाढदिवसाचे औचित्य साधून वेगवेगळे स्टंट करणाऱ्या माथेफिरू, टवाळांच्या टोळ्या शहरांमध्ये कायम आढळून येतात. हे फॅड थेट ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. अशा या ‘टवाळां’ना अनकेदा समज देऊनही ऐकत नाहीत. वारंवार कायद्याचे उल्लंघन करून ही मंडळी धुडगूस घालत असते. याचा परिसरातील इतर नागरिकांनाही होतो. याचे भानही त्यांना उरत नाही.
अशाच एका घटनेत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे बर्थडे बॉय आणि त्याच्या जिवलग मित्राच्या अंगलट आले आहे. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी बर्थडे बॉयने चक्क तलवार वापरली. मित्राला केक भरवला या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावरून व्हायरल झाला होता. ही घटना ५ एप्रिलला उघडकीस आली. या व्हिडीओचा आधार घेत जवाहर नगर पोलिसांनी संबधित तरुणांना अटक केली आहे. महेंद्र रमेश अहिले (२७, रा. हनुमाननगर, गल्ली नंबर १, गारखेडा) अाणि ओंकार विष्णू चव्हाण (२२, रा. हनुमाननगर, गल्ली नंबर ३, गारखेडा) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
महेंद्रचा सोमवारी वाढदिवस होता. घरी दुपारी तलवारीने केक कापण्यात आला. त्यानंतर महेंद्रला तलवारीनेच चव्हाणने केक भरवला. दोन धारदार तलवारी हातात घेऊन व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला.
हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला. तो पोलिसांपर्यंत पोहचला. त्यांनी खात्री करून महेंद्र अहिले आणि ओंकार चव्हाण या दोन तरुणांना अटक केली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तलवारींचा शोध घेऊन पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत.
या घटनेची औरंगाबाद शहर आणि परिसरात जोरदार चर्चा आहे. वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याचा आगाऊपणा चांगलाच अंगलट आला आहे.
COMMENTS