जळगाव : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाची पिछेहाट होवू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. विविध पक्षांतून आयात केलेले उमदेवार आता भाजप...
जळगाव :
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाची पिछेहाट होवू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. विविध पक्षांतून आयात केलेले उमदेवार आता भाजपला सोडून स्वगृही परत जात आहेत. याशिवाय काही मूळ भाजप कार्यकर्तेही पक्षाला रामराम ठोकून सत्तेच्या बाजूने कौल देत आहेत. नुकत्याच झालेल्या जळगाव महापालिकेत महापौर निवडीमध्ये शिवसेनेने भाजपच्या २७ नगरसेवकांना आपल्या गळाला लावून महापौरपदी जयश्री महाजन यांना विराजमान केले. मात्र, त्यानंतर पाया खालून वाळू सरकलेल्या भाजपाने नाशिक येथील विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे धाव घेत भाजपातील २७ नगरसेवकांना व्हीप बजावून देखील त्यांनी नियम धाब्यावर बसवले. त्यामुळे भाजपची मोठी नाचक्की झाली आहे.
याप्रकाराणे भाजप आता सैरभैर झाला आहे. शिवसेनेला मदत करणाऱ्या २७ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे, यासाठी जळगाव महापालिकेचे भाजपाचे गटनेते भरतराम बालाणी यांनी बुधवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली आहे.
७५ पैकी ५७ नगरसेवक भाजपचे असून देखील महापौरपद शिवसेनेकडे गेल्याने स्थानिक नेत्यांसह राज्यातील प्रमुख नेतेही संतापले आहेत. त्यामुळे २७ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची भाजप नेते बालानी यांनी मागणी केली आहे. यावर काय निर्णय होणार याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.
COMMENTS