नगर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारणी जाहीर प्रतिनिधी : आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत...
नगर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारणी जाहीर
प्रतिनिधी :
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पक्ष संघटन मुजबुत करण्यासाठी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आघाडीच्या माध्यमातून युवक प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित पदाधिकारी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील, असा विश्वास जिल्हा सरचिटणीस गौरव नरवडे यांनी व्यक्त केला.
नुकतीच नगर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. पदाधिकाऱ्यांची निवड करताना ग्रामीण भागातील युवकांना संधी देण्यात आली. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असुन आगामी सहा महिने पदाधिकाऱ्यांचे काम पाहून या नियुक्त्या कायम करण्यात येणाऱ्या असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव नरवडे यांनी दिली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे :
तालुकाध्यक्ष - शाहबाज शेख ,
तालुकाउपाध्यक्ष - विवेक सुंबे , संदिप गोरे , अभिषेक सुसे , आकाश धामणे ,
तालुका सरचिटणीस - शंकर पवार , शुभम उदमले , अभिषेक घाडगे , विकास भोर ,
सचिव - बाबासाहेब गायकवाड , चंद्रकांत जपकर , विजय खोटे , राजेंद्र मोहिते ,
संघटक - रोहित झरेकर ,
प्रवक्ता - ओंकार झावरे
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS