चेन्नई : एआयएडीएमकेने मंगळवारी द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिनवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी मतदान केंद्रावर...
चेन्नई :
एआयएडीएमकेने मंगळवारी द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिनवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी मतदान केंद्रावर पक्ष चिन्ह विणलेला शर्ट घालून मतदान केले. त्यांची ही कृती आचारसंहितेचा भंग करणारी आहे, असे एआएडीएमकेचे नेते बाबू मुरुगावे यांनी म्हटले आहे.
एएमएडीएमकेचे नेते बाबू मुरुगावे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
मतदान केंद्र अधिकारी यांनी म्हटले आहे की, उदयनधी यांच्या शर्टवर कोरलेले चिन्ह हे द्रमुक पक्षाचे अधिकृत चिन्ह नव्हते तर द्रमुक युवा संघटनेचे होते. उदयनिधी हे द्रमुक युवा संघटनेचे सचिव आहेत.
उदयनिधी हा द्रमुक अध्यक्षांचा मुलगा आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीत तो पदार्पण करीत आहेत.
COMMENTS