प्रतिनिधी : नगर अनिल शेडाळे, सरपंच, मदडगाव नगर तालुक्यातील मदडगावचे सरपंच अनिलराव शेडाळे यांची सरपंच सेवा महासंघ , महाराष्ट राज्यच्या अहम...
प्रतिनिधी : नगर
अनिल शेडाळे, सरपंच, मदडगाव |
नगर तालुक्यातील मदडगावचे सरपंच अनिलराव शेडाळे यांची सरपंच सेवा महासंघ , महाराष्ट राज्यच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरपंच सेवा महासंघ अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे व प्रसिद्घीप्रमुख भाऊसाहेब कळसकर यांनी ही नियुक्ती नुकतीच जाहीर केली.
अनिल शेडाळे सुमारे १५ वर्षांपासून राजकारण-समाजकारणात सक्रीय आहेत. सरपंचपदाच्या कार्यकाळातील त्यांचे काम वाखाणण्याजोगे असून त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
सरपंच सेवा महासंघाच्या पुढील वाटचालीत अनिल शेडाळे हे भरीव योगदान देतील. संघटनात्मक बांधणीतून संघटनेची पाळेमुळे खोलवर रुजविण्यासाठी ते परिश्रम घेतील. त्यांच्यातील अंगभूत नेतृत्व कौशल्याने ते आम्ही केलेली निवड सार्थ ठरवतील, असा विश्वास सरपंच सेवा महासंघ अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी व्यक्त केला.
सरपंच अनिल शेडाळे यांच्या निवडीबद्दल राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सरपंच सेवा महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने विशेष आनंद झाला आहे. मात्र, त्याचबरोबर जबाबदारीही वाढली आहे. आगामी काळात संघटनेच्या उज्वल भविष्यासाठी तन मन लावून काम करणार असून गावच्या सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सरपंच सेवा महासंघाचे नवनियुक्त दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल शेडाळे यांनी ‘राज्यकर्ता’शी बोलतांना सांगितले.
COMMENTS