Advt

advt top 2

सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आरोग्य विभागाला सुपूर्द !

अहमदनगर : प्रतिनिधी  ‘सेव्ह द चिल्ड्रन - बाल रक्षा भारत’ या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण करण्यात आले. जिल्हा ...

अहमदनगर : प्रतिनिधी 

‘सेव्ह द चिल्ड्रन - बाल रक्षा भारत’ या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद, अहमदनगर आरोग्य विभाग तसेच राहुरी येथील कै. डॉ. बाबुराव दादा सेवाभावी संस्था, यांना संस्थेमार्फत काही आवश्यक यंत्रसामुग्रीची मदत करण्यात आली.  

संस्थेच्या उपक्रमाविषयी : 

सेव्ह द चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय संस्थेबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. ही संस्था जगभरात १२० देशात, भारतामध्ये १९ राज्यांत बालकांच्या हक्क व अधिकारावर व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. कोविड १९ परिस्थितीमध्ये भारत देशामधील परिस्थितीत सुधारणा व्हावी. भारतीय नागरिकांचे जनतेची कोरोना महामारीतुन लवकरात लवकर सुटका व्हावी. तसेच देशाच्या आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण कमी होणे कामी संस्थेमार्फत देशातील विविध ठिकाणी यांत्रिक उपकरणे वाटपाचे कार्य हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमार्फत सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया व आता बेंगलोर मधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागविण्यात आले होते. ते सर्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई व पुणे विमानतळावरून देशातील विविध राज्यात यापूर्वी एकूण ३९ शहरात पोहविण्यासाठी संस्थेने काम केले. 

संस्थेच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषदेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करताना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्संयासमवेत संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. हरिश वैद्य, प्रकल्प समन्वयक श्री. गणेश ताठे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण मनोज ससे उपस्थित होते.  

अहमदनगर मध्येही दि. रोजी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेला 05 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी सेव्ह द चिल्ड्रन - बाल रक्षा भारत संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. हरिश वैद्य, प्रकल्प समन्वयक श्री. गणेश ताठे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण मनोज ससे आदी मान्यवर उपस्थित होते.  

जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुरुष संदीप काळे, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्जुन दळवी, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. 

उर्वरित ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रम बालाजी मंदिर देवस्थान येथील कोविड केअर सेंटर, राहुरी येथे आयोजित करण्यात आला होता. माजी नगराध्यक्षा, डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, डॉ. साबळे, सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेचे पदाधिकारी, कार्यक्रमाधिकारी उपस्थित होते. 

 राहुरी येथे माजी नगराध्यक्षा, डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण करण्यात आले. 


ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ऑस्ट्रेलिया तसेच बँगलोर वरून आणण्यासाठी संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ व्यवस्थापिका श्रीमती. शिरीन मॅथ्यूव्ह, सहाय्यक व्यवस्थापिका अपर्णा जोशी, अमिताव बारीक, वाणिज्य समन्वयक मनोज गोयल व प्रशासन समन्वयक आरिफ हमाल आदींनी अथक परिश्रम घेतले. 

भारतातील विविध राज्यांना व महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक व मालेगाव, जिल्हा परिषद नाशिक, अहमदनगर, पंचायत समिती सिन्नर, इगतपुरी अशा विविध ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात संस्थेचे बालकांशी संबंधीत विविध प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती संस्थेचे डेप्युटी डायरेक्टर श्री. संजय शर्मा यांनी दिली. संस्थेमार्फत आरोग्य विभागाला लागणारे यांत्रिक उपकरणे, औषधे, सर्जिकल सामान तसेच कोरोना माहामारीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील झोपडपट्टीतील व ग्रामीण भागात आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेला अन्न धान्य वाटप, वैयक्तिक कौटुंबिक स्वच्छतेसाठी  किशोरवयीन मुली, गर्भवती माता, स्तनदा माता यांना स्वच्छता किट (हायजिन किट) वाटपाचे काम संस्थेचे मार्फत मागील वर्षी कोवीड माहामारीमध्ये वाटप केले होते. याही वर्षी सामजिक हिताची व आवश्यक साहित्य वाटपाचे कार्य संस्थेमार्फत चालू आहे. कोरोनामुळे मुलाच्या शिक्षणात खंड पडलेला आहे परंतु, बालके शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नयेत म्हणुन संस्थेमार्फत कार्यक्षेत्रातील बालकांना एज्युकेशन किट लर्निंग कीटचेही लवकरच वाटप करण्यात येणार असल्याबाबत श्री. शर्मा यांनी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन सूची यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल उतोरोत्तर पुढच्या दिशेने सुरु आहे.  

 

COMMENTS

BLOGGER: 1

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आरोग्य विभागाला सुपूर्द !
सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आरोग्य विभागाला सुपूर्द !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6ZF8JlcaGsBOWDw_aUWg2Njmq8J4ezlxqs06kYNN6Fr9I3AsnE-YJ1-CV7cDvpYTl4P0j0zYxTtKcLmo8OgCJpW2qMAzFPLx-ZHtC0H-ap0Z3knk1xZkvQOYhprlZmrElyRud-ZnJm2ZW/s320/%25E0%25A4%2585+%25E0%25A5%25A7.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6ZF8JlcaGsBOWDw_aUWg2Njmq8J4ezlxqs06kYNN6Fr9I3AsnE-YJ1-CV7cDvpYTl4P0j0zYxTtKcLmo8OgCJpW2qMAzFPLx-ZHtC0H-ap0Z3knk1xZkvQOYhprlZmrElyRud-ZnJm2ZW/s72-c/%25E0%25A4%2585+%25E0%25A5%25A7.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_31.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_31.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content