प्रतिनिधी : अहमदनगर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत कोविड १९ च्या लसीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावरून पत्रकार मिलिंद देखणे य...
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत कोविड १९ च्या लसीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावरून पत्रकार मिलिंद देखणे यांना आरोग्य अधिकारी श्री. सतीश राजूरकर यांनी नोटीस पाठवलेली आहे. ही नोटीस सोशलमिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा प्रश्न विचारल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
आरोग्य अधिकार्यांनी बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, ‘मनपाच्या लसीकरण केंद्रामधून लस बाहेर विकली जाते, असा प्रश्नवजा तक्रार आपण केली आहे. ही बाब आपण मनपा प्रशासनाच्या लक्षात आणून न देता थेटपणे पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत विचारणे उचित नाही. ही बाब आरोग्य कर्मचार्यांचे मनोबल व उत्साह खच्चीकरण करणारी आहे. आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती आणि पुरावे तीन दिवसांच्या आत सादर करावेत.’
याबाबत, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाना साधला आहे. सध्या ही महापालिका भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेऊन महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याप्रकरणी आक्रमक बाणा दाखवला आहे. उपाध्ये यांनी ट्विटरवर महापालिकेचे अजब पत्र टाकताना महाराष्ट्रात तालिबानी राजवट लागू झाल्याचा मुद्दा मांडला आहे.
उपाध्ये यांनी म्हटलेय की, महाराष्ट्रात तालीबानी राजवट..? पत्रकारांनो, प्रश्न विचाराल तर नोटीस पाठवू. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना यांना लसीकरणाबाबत प्रश्न विचारला म्हणून शिवसेनेचे महापौर असलेल्या अहमदनगर महापालिकेने पत्रकारांना नोटीस बजावली आहे. 15 ऑगस्टला 'सामना'चे प्रतिनिधि मिलिंद देखणे यांनी मुश्रीफ यांना प्रश्न विचारले म्हणुन त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे.
https://twitter.com/keshavupadhye/status/1427939057984749570?s=20
COMMENTS