मुंबई : भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात 54,779.66 ची विक्रमी पातळी गाठल्यानंतर बीएसई सेन्सेक्स ...
मुंबई :
भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात 54,779.66 ची विक्रमी पातळी गाठल्यानंतर बीएसई सेन्सेक्स 152 अंकांनी वाढून 54,554.66 वर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी 50 ने ही 16,359 ची सर्वोच्च पातळी गाठली, पण शेवटी फक्त 22 अंकांनी 16,280 वर बंद झाली. भारती एअरटेलच्या शेअर्सने आज बाजारात वर्चस्व गाजवले. एअरटेलचे शेअर्स 4 टक्क्यांपर्यंत वाढले. एअरटेल सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढ नोंदविणारा शेअर ठरला आहे.
एअरटेलचा शेअर्स कालच्या दिवशी 599.25 रुपयांना बंद झाला होता. सकाळी मात्र बाजार सुरु होतानाच त्याने काहीशी उसळी घेत 602.20 रुपयांवर पोहचला. काहीशी घसरणीसह या शेअरने आज जवळपास 29 रुपयांनी उसळी घेतली होती. आत्तापर्यंतची सर्वाधिक उंची एअरटेलने गाठली आहे.
बाजारबंद होताना सुमारे 4 टक्क्यांच्या वाढीसह एअरटेल 622.20 रुपयांवर होता. एअरटेलनंतर टेक महिंद्रा, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. टाटा स्टीलचे शेअर्स आज बाजारात सर्वाधिक घसरले. त्याचे शेअर्स 2.7 टक्क्यांनी घसरले. याशिवाय पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, एनटीपीसी, आयटीसी, बजाज ऑटो आणि एसबीआयनेदेखील खराब कामगिरी केली. जोपर्यंत क्षेत्रीय निर्देशांकांचा संबंध आहे, निफ्टी बँक निर्देशांक सपाट बंद झाला. तर निफ्टी आयटी निर्देशांकात एक टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी मेटल रेड झोनमध्ये बंद झाले.
COMMENTS