प्रतिनिधी : मुंबई ग्रामसेविका पी. व्ही. भोर राज्याचे जलसंपदा, शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आणि कामगार विभागाचे...
प्रतिनिधी : मुंबई
ग्रामसेविका पी. व्ही. भोर |
राज्याचे जलसंपदा, शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी ग्रामसेविका प्रियंका विठ्ठल भोर यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्यालयाने श्रीमती भोर यांच्या अभिनंदनाचे पत्र पाठविले आहे.
श्रीमती प्रियंका भोर – जाधव या कर्जुने खारे येथे ३ वर्षांपासून सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी गावचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकोपयोगी शासन योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली. वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. आदिवासी भिल्ल समुदायाला हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या शबरी आवास योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेचा योग्य समन्वय साधला. त्यातून कर्जुने खारे येथे शबरीनगर गृहसंकुल योजना राबविण्यात आली. या योजनेत तब्बल ६० कुटुंबाना पक्क्या घरकुलांचा लाभ मिळाला आहे. ही योजना पहिल्यांदाच इतक्या प्रभावीपणे राबविण्यात आली असल्याने देशभरातील पहिला-वाहिला प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या उपक्रमाच्या कामाबद्दल ग्रामसेविका भोर यांच्या योगदानाबद्दल ना. बच्चू कडू यांनी अभिंनदन केले आहे.
सदरच्या पत्राद्वारे ना. बच्चू कडू यांनी ग्रामसेविका पी. व्ही. भोर यांचे अभिनंदन केले आहे. |
'नामदार बच्चू कडू यांनी कामाची दखल घेत अभिनंदनाचे पत्र पाठविल्याने विशेष आनंद झाला आहे. शासकीय योजनांचा थेट शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्याला ग्रामस्थांनी योग्य साथ दिली आहे. त्यामुळेच देशातील पहिला प्रकल्प कर्जुने खारे येथे यशस्वी झाला आहे. पुढच्या कार्यकाळातही लोककल्याणकारी विविध योजनांची अंमलबजावणी करणे, गावातील सर्वांगीण विकासात्मक कामात योगदान देणार' असल्याची प्रतिक्रिया ग्रामसेविका प्रियंका भोर यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS