चंदिगढ : https://twitter.com/DiprHaryana/status/1423977423457030151?s=20 हरियाणा पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2021 ( Hariyan...
चंदिगढ :
https://twitter.com/DiprHaryana/status/1423977423457030151?s=20
हरियाणा पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2021 ( Hariyana Police Constable Recruitment Exam 2021) रद्द करण्यात आली आहे. आयोगाने (HSSC) आपल्या अधिकृत वेबसाइटवर पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने पेपर रद्द करण्याच्या कारणांबाबत तपशील दिला नसला, तरी काँग्रेसने पेपर फुटीचा दावा करत खट्टर सरकारवर निशाणा साधत आहे.
हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशन (HSSC) ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करताना माहिती दिली की, 'जाहिरात क्रमांक 04/2020 कॅट नं. - 01 हरियाणा पोलीस विभाग हरियाणामधील पुरुष गटाची कॉन्स्टेबल भरती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया 7 आणि 8 ऑगष्ट रोजी होणार होती. नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. असे आदेशात म्हटले आहे.
ऐनवेळी हरियाणा कॉन्स्टेबल भरती परीक्षा रद्द झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी खट्टर सरकारवर टीका केली. पेपर फुटीच्या प्रकरणात जे सहभागी आहेत त्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की, भाजप सरकारच्या काळातील पेपर फुटीचे हे 28 वे प्रकरण आहे. कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा पेपर लाखो रुपयांना विकला गेला आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या तरुणांचे भविष्य पुन्हा एकदा अंधकारमय झाले असून ‘या’ ठगांनी त्यांचा जणू बळी दिला आहे. ह्या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदींनी जबाबदारी घेतली पाहिजे.
COMMENTS