प्रतिनिधी : पाथर्डी जनतेच्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासन काम करत असते. मात्र, अनेकदा प्रशासकीय यंत्रणा आपल्या कामात कुचरा...
प्रतिनिधी : पाथर्डी
जनतेच्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासन काम करत असते. मात्र, अनेकदा प्रशासकीय यंत्रणा आपल्या कामात कुचराई करते. वारंवार निवेदने देऊनही या प्रश्नांची सोडवणूक होतांना दिसत नाही. त्यावेळी सामाजिक संघटना एकत्र येऊन आंदोलने आणि मोर्चे काढून या ढिम्म प्रशासनाला जाग यावी, म्हणून प्रयत्नशील असतात. असेच एक अभिनव आंदोलन पाथर्डी येथील विविध समाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी ‘बोंबाबोंब’ आंदोलन केले आहे.
काय आहेत पाथर्डीकरांच्या मागण्या
पाथर्डी शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी घरकुल योजनेचे प्रलंबित अनुदान रक्कम त्वरित द्यावी. शहरामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लाऊन कायम स्वच्छता ठेवावी. स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्कचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंद पडलेले असून अर्धवट आहे. खुले नाट्यगृह या जागेवर चालू असलेल्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. या दोन्ही कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी. शहरात अनेक ठिकाणी घाण पाण्याचे डबके साचलेले आहेत, तर उपनगरात बऱ्याच ठिकाणी झाडेझुडपे मोठ्या स्वरूपात वाढली आहेत. त्याची स्वच्छता झाली पाहिजे, आदी मागण्याचे निवेदन मुख्यधिकारी धनंजय कोळेकर यांना देण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. दिनकराव पालवे, आपचे जिल्हा संयोजक किसन आव्हाड, मनसेचे संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, सुनील पाखरे, अशोक ढाकणे, किशोर सानप, नागनाथ गर्जे, नवाब शेख, शब्बीर शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
COMMENTS