प्रतिनिधी : नगर सरकारी नोकरी मिळावी, हा अनेकांचा अट्टाहास. ‘ती’ मिळावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करणारे अनेक आहेत. तर काही जण ‘जुगाड’ करून का ह...
प्रतिनिधी : नगर
सरकारी नोकरी मिळावी, हा अनेकांचा अट्टाहास. ‘ती’ मिळावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करणारे अनेक आहेत. तर काही जण ‘जुगाड’ करून का होईना पण सरकारी नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न अयशस्वी झाला आहे. एक-दोन नव्हे तब्बल ११ ठगांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर जिल्हयातील उपविभागीय अधिकारी यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील ८४ रिक्त पदांसाठी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
२ जुलै २०१९ ते दि. २६ जुलै २०१९ या कालावधीमध्ये महापरीक्षा पोर्टल यांचेमार्फत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली होती. २३ डिसेंम्बर २०१९ रोजी विचारक्षेत्रात असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. ३ जानेवारी २०२० ते ७ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
दरम्यान या परीक्षेत पात्र उमेदवारांपैकी ११ जणांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन पत्रासमवेत अपलोड केलेला फोटो, कागदपत्र पडताळणीवेळी सादर केलेला फोटो व परीक्षा केंद्रावर उमेदवाराचा घेण्यात आलेला फोटो यामध्ये तफावत असल्याची बाब कागदपत्रांची पडताळणी करताना निदर्शनास आली होती. तसेच स्वाक्षरी मध्ये तफावत आढळून आली आहे. यातील काही जणांनी बनावट कागदपत्रे सादर केले आहेत. ही गंभीर बाब चौकशी अंती समोर आली आहे.
त्यामुळे ‘त्या’ ११ शंकास्पद उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब करुन शासनाची फसवणुक केलेली असल्याने, या उमेदवारांबिरुध्द भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ४२०, कलम ४१९, कलम ४१७ व माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ मधील कलम ६६.५ अन्वये कोतवाली पोलिस स्टेशन येथे ९ व १० मार्च रोजी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस करीत आहेत.
COMMENTS