प्रतिनिधी : शेवगाव - नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्यांमध्य...
प्रतिनिधी : शेवगाव -
नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्यांमध्ये राजकीय कुरघोडीच्या हेतूने अनेक बदल घडविले जातात. असे अनेक प्रकार उघडकीस येतात. प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांची नावे यादीतून गायब केल्यास निवडणूक 'सोपी' करण्याचा हा डाव फसला आहे.
शेवगाव नगर परिषद निवडणूक होऊ घातली आहे. प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात बरेच घोळ झाल्याचे दिसून येत आहे. मनसे कार्यकर्ते अमोल पालवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे नावे मतदार यादीतून गायब असल्याचा प्रकार घडला आहे.
नगर परिषदेच्या मतदार प्रारुप मतदार यादीतून माझ्यासह कुटुंबाची नावे गायब केली आहेत. असा आरोप करत अंतिम यादीत नावे समाविष्ट करावीत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह उपोषणास बसण्याचा इशारा मनविसेचे तालुकाध्यक्ष अमोल महादेव पालवे यांनी तहिसलदार अर्चना पागिरे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील खंडोबानगर आखेगाव रोडवर येथे आई, वडील व बहिणींसह वास्तव्यास आहे. नगर परिषदेच्या १०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नव निर्माण सेना या पक्षाच्या वतीने वार्ड क्रमांक १४ मध्ये उमेदवारी केली होती. विधानसभेला येथेच कुटूंबासह मतदान केलेले आहे. अंतिम यादीत आमची नावे समाविष्ट न झाल्यास मी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा पालवे यांनी दिला आहे.
COMMENTS