प्रतिनिधी : शेवगाव - आव्हाने बर्हाणपूर जवळील दिंडेवाडी शिवारात गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर व एक जेसीबीवर महसूल विभागाच्या पथ...
प्रतिनिधी : शेवगाव - आव्हाने बर्हाणपूर जवळील दिंडेवाडी शिवारात गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर व एक जेसीबीवर महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कारवाई केली. अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी जेसीबी मालक शिवाजी दिंडे व ट्रॅक्टर मालक हनुमंत दिंडे, ठकाजी नेहाबा दिंडे यांना ९ लाख ७० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली.
ही कारवाई ढोरजळगावचे मंडलाधिकारी रमेश सावंत, तलाठी चंद्रकांत गडकर,प्रदीप मगर, अमोल कचरेे, किशोर पवार, अमर शेंडे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी तालुक्यातील एका मोठ्या पुढार्याने हस्तक्षेप केल्याची चर्चा शहरात होती. हा पुढारी कोण हे मात्र कळू शकले नाही.
COMMENTS