बीड : आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र, या वर्षी ...
बीड :
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र, या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रशासनाने काही नियम घालुन दिलेले आहेत. त्यानुसार, प्रशासकीय यंत्रणेने यात्रा उत्सवास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाची यात्राउत्सव रद्द करण्याचा निर्णय शेख महंमद महाराज यात्रा कमिटीने घेतला आहे.
नियमांचे पालन करावे : यात्रा कमिटी, वाहिरा
फाल्गुन शुध्द नवमीच्या रात्री हिंदु मुस्लिम धर्मिय भाविक शेख महंमद महाराजांच्या समाधीवर चंदनलेप, फुलांचा हार व चादर अर्पण करुन यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. तर दशमीच्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने नैवद्यरुपी (मलिदा)प्रसाद वाहिला जातो. या दिवशी महाराजांची पालखी मिरवणूक टाळ, मृदंगाच्या गजरात, आनंदी वातावरणात बंगल्यापासून समाधीपर्यंत येते. सर्व भाविकांच्या सहकार्याने यात्रोत्सवात आजही राज्यातील व राज्या बाहेरील सर्व धर्मिय भक्त सहभागी होत असत. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे आयोजनावर निर्बंध आले आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी खेळणे, पाळणे लावण्यात आलेले नाहीत. प्रतिवर्षीप्रमाणे कोणताही सांस्कृतीक कार्यक्रम होणार नसल्याचे तसेच शासन नियमांचे पालन करण्याचे अवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS