खरेदीची सुवर्णसंधी, लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढली प्रतिनिधी : सध्या लग्नसराईचा मोसम आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी सोन्याच्या भावा...
खरेदीची सुवर्णसंधी, लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढली
प्रतिनिधी : सध्या लग्नसराईचा मोसम आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी सोन्याच्या भावाने उंची गाठली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे बाजारभाव सातत्याने खाली येत आहेत. साधारणपणे सात महिन्यांपूर्वी म्हणजेच ७ ऑगस्टला सोन्याचा भाव ५६,१२६ रुपये प्रति दहा ग्रॅम या विक्रमी उच्च स्तरावर होता. तर ३ मार्चला शेअर बाजारात सोन्याच्या भावात सुमारे १ टक्क्यांची घट झाली. ४५०९४ रु. प्रति दहा ग्रॅमपर्यत बाजारभाव खाली आला होता.
लग्नसराईमुळे सोन्याला बाजारात वाढती मागणी आहे. ज्यांनी यापूर्वी खरेदी लांबणीवर टाकली होती, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. ज्यांना गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल, त्यांनीही गुंतवणूक करायला हरकत नाही. बाजारातील मागणीचा दबाव वाढला की पुन्हा भाव वधारतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
COMMENTS