मुंबई: आपले कारचे स्वप्न साकार करणे पुढील महिन्यात एप्रिल २०२१ पासून महाग होईल. मारुती सुझुकी इंडिया नंतर आता वाहन निर्माता कंपनी निसान इंड...
मुंबई:
आपले कारचे स्वप्न साकार करणे पुढील महिन्यात एप्रिल २०२१ पासून महाग होईल. मारुती सुझुकी इंडिया नंतर आता वाहन निर्माता कंपनी निसान इंडियानेही आपल्या सर्व मोटारींच्या किंमती पुढील महिन्यापासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जपानी वाहन उत्पादक निसान इंडियाने मंगळवारी २३ मार्च रोजी घोषणा केली की, कच्चा माल व स्पेअरपार्टच्या खर्चात वाढ झाल्याने कंपनीच्या सर्व वाहनांच्या किंमती वाढविल्या जातील. कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, १ एप्रिल २०२१ पासून निसान आणि डॅटसनच्या सर्व उपलब्ध मॉडेल्सच्या किंमती वाढतील. तथापि, सर्व मॉडेल्सची किंमत किती वाढविली जाईल, याचा कंपनीने खुलासा केलेला नाही.
उत्पादन खर्चातील वाढीमुळे निर्णय
निसान या जपानी कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑटो स्पेअरपार्टच्या किंमती सतत वाढत आहेत. पूर्वी, कंपनीने गेल्या कित्येक महिन्यांपासून हे व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता कंपनीने निसान आणि डेटासूनच्या सर्व गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कारच्या श्रेणीप्रमाणे वाढ ही भिन्नभिन्न असेल. निसान मोटर इंडियाचे एमडी राकेश श्रीवास्तव म्हणाले की, प्रत्येक श्रेणीतील किंमती स्वतंत्रपणे वाढविल्या जात आहेत परंतु, तरीही समाधानकारक किंमतीत भारतीय ग्राहकांना कार उपलब्ध करुन देण्यात येईल. कंपनी भारतात मॅग्नाइट, किक, रेडी-गो आणि गो आदी कार मोडेलची विक्री करते.
मारुतीच्या गाड्याही महागतील
देशातील सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) यापूर्वी वाढीव उत्पादन खर्चामुळे आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. ही किंमत वाढ १ एप्रिल २०२१ पासून अंमलात येईल. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. मोडेल्सच्या प्रकारानुरूप किंमतीतील वाढ ही भिन्न असेल. तथापि, कंपनीने पुढील महिन्यापासून वाढणार्यां किंमतीबद्दल माहिती दिली नाही. मारुती सुझुकी एंट्री-लेव्हल अल्टो ८०० पासून एस-क्रॉस क्रॉसओवरपर्यंत अनेक मॉडेल्सची विक्री करते.
COMMENTS