जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रीडा विभागाच्या पुढाकारातून शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य क्षेत्रात व...
जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रीडा विभागाच्या पुढाकारातून शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या युवती, महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते कर्तृत्ववान युवती, महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, प्रदीप पाटोळे, मच्छिंद्र साळुंखे, नारायण कराळे, मुकुंद नेवसे, चंद्रकांत वंजारी, प्राजक्ता नलावडे, अदील सय्यद, प्रसाद पाटोळे, मंदार सर, सरचिटणीस नलिनीताई गायकवाड, सेवादल महिला अध्यक्ष कौसर खान, उषा भगत, नीता बर्वे, सुनीता बागडे, शेवगाव महिला अध्यक्ष कल्पना खंडागळे, डॉ.जहिदा शेख, सीमा बनकर, सुमन काळापहाड, शबाना शेख आदींची उपस्थिती होती.
COMMENTS