पेट्रोल, डिझेल आणि डाळींचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आता खाद्य तेलाच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे ‘बजेट’ बिघ...
पेट्रोल, डिझेल आणि डाळींचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आता खाद्य तेलाच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे ‘बजेट’ बिघडले आहे. खाद्य तेलाच्या किंमती यापुढेही काही अंशी वाढतील, असे तज्ञांचे मत आहे. सोमवारी क्रूड पाम तेलाच्या (सीपीओ) किंमतीत प्रचंड वाढ झाली. सिपिओचे भाव प्रति १० किलोसाठी ११०५ रु. इतका झाला. ही वाढ गेल्या १० वर्षातील सर्वात मोठी आहे. त्यामुळे सर्व खाद्य तेलांच्या किंमतीही वाढतील. तेलबियांना हमीभावापेक्षा अधिक बाजारभाव मिळत आहे. त्यातच सीपीओच्या भाववाढीची भर पडली आहे.
मलेशियात सीपीओ प्रतिटन ३,९१४ रिंगिटपर्यंत (सुमारे ७०,००० रुपये) गेला आहे. भारतात येईपर्यंत त्याचा खर्च प्रति १० किलो १,१०० रुपयांच्या वर आहे.. फेब्रुवारी २०११ नंतरची ही सर्वाधिक किंमत आहे. ब्राझीलमध्ये सोयाबीनची थांबलेली कापणी, अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात ३० टक्के घट, जैवइंधनाचा वाढलेला वापर, रुपयाचा विनिमय दर घटून प्रतिडॉलर ७३ च्या खाली घसरला अाहे. त्यामुळे सर्व वस्तूंची आयात महागली. या सर्व घटकांचा परिणाम तेलाच्या किंमती वाढण्यावर झाला आहे.
गेल्या काही दिवसांत खाद्य तेलाच्या बाजारभावात सुमारे ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. अजून सुमारे ६ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, असे आर्थिक बाबींच्या जाणकारांचे म्हणणे आहे.
मागणीत वाढ तर पुरवठा घटला
सध्या देशभरात लग्नसराईचा काळ असल्याने शुभकार्याच्यानिमित्ताने तेलाची मागणी वाढत आहे. मात्र, बाजारात तेलबियांचा आवक कमी झाली आहे. सीपीओची भाववाढ, आयात खर्चात झालेली वाढ, रुपयाचे झालेले अवमूल्यन या सर्व घटकांचा परिणाम तेलाचे भाव वाढीवर दिसून येतो.
COMMENTS