Advt

advt top 2

जाणून घ्या युरीन इन्फेक्शन म्हंजी काय अन त्यावरील घरगुती उपाय ...

युरीन इन्फेक्शन म्हणजे मुत्रप्रणालीच्या कोणत्याही भागावर होणारा संसर्ग होय. हा आजार स्री – परुष दोघांमध्ये दिसून येतो. स्रियांना वेदना आणि त...



युरीन इन्फेक्शन म्हणजे मुत्रप्रणालीच्या कोणत्याही भागावर होणारा संसर्ग होय. हा आजार स्री – परुष दोघांमध्ये दिसून येतो. स्रियांना वेदना आणि त्रास अधिक जाणवतो. मूत्राशयाच्या संसर्गामुळे ओटीपोटाचा त्रास, लघवी करण्याची तीव्र इच्छा, लघवीसह वेदना आणि मूत्रात रक्त येऊ शकते. मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे पाठदुखी, मळमळ, उलट्या आणि ताप येऊ शकतो. स्वच्छतेच्या कारणास्तव हा संसर्ग होतो. एका संशोधन अहवालानुसार, साधारणपणे ४० % महिला कधी ना कधी ‘या’ संसर्गाचा शिकार ठरतात. 


युरीन संसर्गाची लक्षणे : 

लघवी करताना वेदना किंवा होणे 

लघवी करण्यासाठी बराच वेळ लागणे 

वारंवार मूत्रविसर्जन होणे 

लघवीचा वास येणे 

खालच्या ओटीपोटात वेदना असणे. 

हलका ताप येणे, कंबर दुखीचा त्रास  

लघवीसह अधूनमधून रक्तस्त्राव होणे. 

युरिन इन्फेक्शनवरील घरगुती उपाय

• नारळाचं पाणी

संसर्गामुळे लघवी करताना जळजळ होते. ही वेदना खूपच त्रासदायक असते. यावरील रामबाण घरगुती उपाय म्हणजे नारळाच पाणी. आपल्या  सगळ्यांनाच नारळाचं पाणी प्यायला आवडतं. मग जर तुम्हालाही लघवीला गेल्यावर जळजळ किंवा दुखत असेल तर नारळाच पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय आहे. नारळामध्ये खूप गुणकारी तत्त्व आहेत, जी लघवीमुळे होणारी जळजळ, वेदना आणि बैचेनी यांसारख्या समस्या दूर करतात. जेव्हा आपलं शरीर डीहायड्रेट होतं आणि पाण्याची पातळी कमी होते, अशा वेळीही नारळ पाणी पिणे गुणकारी ठरते. जास्तीत जास्त प्रमाणात नारळाचं पाणी प्यायल्याने लघवीच्या वेळी होणारी जळजळ आणि वेदनेपासून सुटका मिळू शकेल.

• काकडी

काकडीची कोशिंबीर किंवा चटणी हा सुरूवातीपासून भारतीय आहारातील महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. भारतीय जेवणातील डावी बाजू ही कोशिंबीरीसाठीच राखीव असते. याचं मुख्य कारण म्हणजे काकडीतील थंडावा. लघवीच्या वेळी होणाऱ्या जळजळ आणि वेदनेवरील अजून एक उपाय म्हणजे काकडीचं सेवन. कारण यातील अल्कलाईन तत्त्व आपल्याला शरीराला आतून थंडावा देतं आणि पचन क्रियाही सुधारतं. यामध्ये अनेक प्रकारची अँटीऑक्सीडंट्सही आढळतं. त्यामुळे काकडी आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. मग आजपासूनच सलाड, कोंशिबीर आणि चटणीच्या रूपात काकडीचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा.

• व्हिटॅमीन ‘सी’ युक्त पदार्थांचे सेवन 

व्हिटॅमीन सी चं आपल्या निरोगी आरोग्यात खूप महत्त्वाचं योगदान आहे. लघवीच्या वेळी होणारी जळजळ आणि वेदना थांबवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही व्हिटॅमीन सी युक्त पदार्थाचं सेवन करू शकता. व्हिटॅमीन सीमुळे आपल्या लघवीतील अॅसिडची मात्रा वाढते आणि त्यामुळे बॅक्टेरियाचा नायनाट होतो. परिणामी इन्फेक्शनचा धोका कमी होतो. लिंबाचा रस, संत्र्याचा रस, किवी फ्रूट, द्राक्ष आणि आवळा हे व्हिटॅमीन सी चे खूप चांगले स्त्रोत आहे. ज्याचं सेवन केल्यास तुमचं युरिन इन्फेक्शन नक्कीच कमी होईल.

• आलं

प्रत्येक घरातील किचनमध्ये आलं तर हमखास असतंच असतं. ‘आल्या’मधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल तत्वांमुळे लघवीतील बॅक्टेरिया आणि अन्य प्रकारचे व्हायरस यांना आळा बसतो. ज्यामुळे युरिन इन्फेक्शन दूर होतं. तुम्ही आल्याचा रस कोमट दूधातून किंवा आल्याचा चहा किंवा काढा करून प्यायल्याने युरीन इन्फेक्शनपासून होणारा त्रास कमी होतो. 


• दही  

दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.  हेच दही तुम्हाला युरिन इन्फेक्शनमुळे होणारा त्रासही दूर करू शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे दह्यात आहे, बॅक्टेरियाचा नाश करण्याची ताकद आणि चांगला बॅक्टेरिया वाढवण्याची क्षमता. जर योनीमध्ये बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यास दह्यामुळे नक्कीच आराम मिळेल आणि पीएच स्तरही सामान्य राहील.

 • मेथीचे दाणे 

मेथीचे दाणे हे युरिन इन्फेक्शनवरील अजून एक सोपा घरगुती उपाय आहे. मेथीचे दाणे शरीरातील विषारी पदार्थांना शरीराबाहेर टाकतं आणि पीएच स्तर कायम ठेवतात. मेथीच्या दाणांच्या सेवनाने तुम्हाला युरिन इन्फेक्शनमध्ये नक्कीच आराम मिळेल.

• धने

लघवीला होणारी जळजळ आणि वेदना दूर करण्यासाठी तुम्ही धन्याचा वापर करू शकता. कारण धने हे शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतात. तसंच धन्याच्या दाण्यांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणही असतात. जे आपल्याला युरिनरी इन्फेक्शनपासून वाचवतात आणि आपल्या शरीराचं तापमान स्थिर ठेवतात. त्यामुळे धन्याच्या दाण्यांचा वापर हा खूपच गुणकारी आहे.

• थंड दूध 

सायविरहीत थंड दूध प्यायल्याने शरीराचं तापमान स्थिर राहतं आणि लघवीला होणारी जळजळ कमी होते. तुम्ही थंड दूधात वेलची पावडर घालूनही ते पिऊ शकता. हे सर्व घरगुती उपाय वापरून तुम्ही युरिन इन्फेक्शन टाळू शकता. कारण हे सर्वच घरगुती उपाय सोपे आणि गुणकारी आहेत.

                                                                       माहिती संकलन - डॉ. दीपक सोळसे

                                            लेखक हे आयुर्वेदाचार्य असून सुकन्या क्लिनिकचे  ( बोल्हेगाव  ) संचालक आहेत. 


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: जाणून घ्या युरीन इन्फेक्शन म्हंजी काय अन त्यावरील घरगुती उपाय ...
जाणून घ्या युरीन इन्फेक्शन म्हंजी काय अन त्यावरील घरगुती उपाय ...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjaEphXa2o4Y6_sGiv3BQHDAmrTJHUNlFwBCGjXAeh7B2uSsTku0OMDBe6bUWSXWDOi597pmN3nxC-M3R92HHecprNhZBS2raNSNAmJKr0Jmy-LYFLvxcIACSgOLJJ4V_ZIcORgX8IXVLMn/s320/%25E0%25A4%2587%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AB%25E0%25A5%2587%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B6%25E0%25A4%25A8.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjaEphXa2o4Y6_sGiv3BQHDAmrTJHUNlFwBCGjXAeh7B2uSsTku0OMDBe6bUWSXWDOi597pmN3nxC-M3R92HHecprNhZBS2raNSNAmJKr0Jmy-LYFLvxcIACSgOLJJ4V_ZIcORgX8IXVLMn/s72-c/%25E0%25A4%2587%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AB%25E0%25A5%2587%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B6%25E0%25A4%25A8.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/03/blog-post_95.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/03/blog-post_95.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content