मुंबई : बांग्लादेश स्वातंत्र्य लढ्यात आपण सहभागी झालो होतो. बांग्लादेश हे नवीन राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी सत्याग्रह केला, म्हणून तुरुंगव...
मुंबई :
बांग्लादेश स्वातंत्र्य लढ्यात आपण सहभागी झालो होतो. बांग्लादेश हे नवीन राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी सत्याग्रह केला, म्हणून तुरुंगवासही भोगला असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशची राजधानी ढाका येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले आहे. यावरून पंतप्रधान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. गेल्या दोन दिवसांत ते बरेच ट्रोल झाले आहेत.
याच विधानावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मोदींना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, त्यात ते लिहतात, ‘आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायला हवा. मात्र, पंतप्रधान मोदींना नेमकी अटक कधी झाली होती. त्यांना कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते, याबाबत अधिक माहिती दिली तर त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ होईल.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा खोटा भासत आहे, किंवा त्यांनी अधिकचा तपशील द्यावा, म्हणजे त्यांच्यावर विश्वास वाढेल, असे सांगत जयंत पाटील यांनी मोदींची गोची केली आहे.
बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षाला समाजातील प्रत्येक स्तरातून पाठिंबा मिळाला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका सर्वांनाच ठाऊक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुद्द्यावरही नेटककर्यांनी मोदींना घेरले आहे.
जर या लढ्यात इंदिरा गांधीची भूमिकाही महत्वपूर्ण होती हे मोदींनी मान्य केले असेल तर त्यांची अटक कोणाच्या सांगण्यावरून झाली होती. अशा विविध मुद्द्यांवरून मोदींची खिल्ली उडवली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे मातब्बर नेते जयंत पाटील यांचीही भर पडली आहे.
COMMENTS