अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळाची परंपरा वर्षानुवर्षे कायम आहे. यंदा करोना आणि लॉकडाऊन यामुळे ऑनलाईन पद्धतीने ही ...
अहमदनगर :
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळाची परंपरा वर्षानुवर्षे कायम आहे. यंदा करोना आणि लॉकडाऊन यामुळे ऑनलाईन पद्धतीने ही सभा झाल्याने असा गोंधळ होणारच नाही असे वाटत होते. मात्र, रोहोकले गटाच्या दोघांनी ऑफलाईन पद्धतीने गोंधळ घालून ही गोंधळाची परंपरा आणखी पुढे नेली. अखेर पोलिसांना यात हस्तक्षेप करावाच लागला.
रोहोकले गटाचे विकास डावखरे व प्रवीण ठुबे यांनी प्रत्यक्ष बँकेत जाऊन संचालकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न केले. बँकेची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. सकाळी दहा वाजता सुरू झालेली सभा दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती.
चेअरमन राजू राहाणे आणि व्हाईस चेअरमन उषा बनकर यांनी सभेत पहिला विषय मागील प्रोसिडिंग कायम करणे हा सर्वानुमते कायम केला. दुसरा विषय अहवाल आणि ताळेबंद मंजुरीचा मंजुरीला टाकल्यानंतर चर्चेला सुरुवळ झाली. संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, राजू साळवे, राजेंद्र निमसे, एलपी नरसाळे, मीनल शेळके, विकास डावखरे, एकनाथ व्यवहारे, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र ठोकळ, संतोष वाघमोडे, विठ्ठल काळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
गुरूमाऊली मंडळाचे नेते बापू तांबे यांनी सांगितले की, घड्याळ खरेदी माजी चेअरमनच्या निर्णयानुसार झालेली आहे. जे लोक परवानगी न घेता सभेत शिरकाव करतात त्यावरून, नेता तसा कार्यकर्ता यावृती प्रमाणे ते वागतात. त्यांनी सभेची ४५ मिनिटे वेळ घेऊन या सभेला गोलबोट लावले.
रोहोकले गटाचे विकास डावखरे व प्रवीण ठुबे यांनी एन्ट्री करून संचालकांना धारेवर धरताना रोहोकले गुरुजींचा चेहरा समोर आल्यानंतरच बँकेत ठेवींचा ओघ वाढला असा दावा केला. ताळेबंदला विरोध करतो, तुम्ही घोटाळा करता. सर्व संचालकांची व कर्मचाऱ्यांची नोर्को टेस्ट करा तरच दुध का दुध पाणी का पाणी होईल, असेही त्यांनी म्हटले.
गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे म्हणाले की, ऑनलाइन सभा असल्याने गोंधळ होणार नाही अशी अपेक्षा होती, मात्र या लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सभेला गालबोट लागले हे दुर्दैवी आहे.
COMMENTS