मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात शेती व्यवसायासह जोडधंदा म्हणून प्रामुख्याने शेळीपालन केले जाते. शेळीला ‘गरिबा घरची गाय’ असेही म्हणतात. अनेक छ...
मुंबई :
महाराष्ट्रासह देशभरात शेती व्यवसायासह जोडधंदा म्हणून प्रामुख्याने शेळीपालन केले जाते. शेळीला ‘गरिबा घरची गाय’ असेही म्हणतात. अनेक छोटे शेतकरी शेळीपालन करून गुजरान करत आहेत. बोकडाच्या मांसाला बाजारात मोठी मागणी असते. तसेच शेळीचे दुध दुर्मिळ असल्याने त्यालाही चांगली मागणी आहे. जातिवंत शेळ्यांना बाजारात चढा भाव मिळतो. त्यामुळे शेळीपालन व्यवसायाकडे अनेक शेतकरी आकर्षित झाल्याचे दिसून येते.
शेळीच्या संगोपनास अत्यंत कमी खर्चात येतो. अल्प भांडवल व कमी जागेत सुरु होणारा हा व्यवसाय असल्याने अनेक सुशिक्षित तरुणही या व्यवसायास प्राधान्य देताना दिसतात. हमखास नफा देणाऱ्या या व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेळ्यांचे गट वाटप करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. याच योजनेचा अधिकचा तपशील जाणून घेऊयात.
योजनेचे नाव : शेळयांचे गट वाटप करणे
राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने ( बंदिस्त शेळीपालन ) संगोपन करण्यासाठी 40 + 2 शेळयांचे 50% अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. पंचायत समिती स्तरावर याबाबत अर्ज स्वीकारले जातात.
सदर योजनेमध्ये एकूण 660 गट वाटप करायचे आहे. या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.
योजनेचा तपशील (एक शेळीगट खर्चाचा तपशील)
COMMENTS