नगर : प्रतिनिधी चिचोंडी पाटील येथील कोविड सेंटरची पाहणी करताना उपसभापती डॉ. पवार, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले समवेत इतर. तालुक्यात सुरू अस...
नगर : प्रतिनिधी
चिचोंडी पाटील येथील कोविड सेंटरची पाहणी करताना उपसभापती डॉ. पवार, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले समवेत इतर. |
तालुक्यात सुरू असणारा कोरोनाचा कहर आणि त्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष यावर लक्ष वेधणाऱ्या अनेक बातम्या स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची धांदल उडाली. त्यांनतर उप जिल्हाधिकारी अजित थोरबोले, पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार, तहसीलदार, आरोग्यधिकारी यांनी चिचोंडी पाटील कोविड सेंटरला भेट देत तालुक्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
नगर तालुक्यात कोविड चा विस्फोट पहावयास मिळत आहे. गावोगावच्या शासकीय आकडेवारी पेक्षा चार ते पाच पट अधिक रुग्ण प्रत्येक गावात आहेत. तालुक्यात एकमेव कोविड सेंटर चिचोंडी पाटील येथे आहे. ते ही १५ डिसेंबर ते २५ मार्च या काळात सव्वातीन महिने बंद होते. त्यामुळे रुग्णांची परवड झाली. कोरोना सेंटर बंद असल्यानेही रुग्णांचे प्रचंड हाल झाले. रुग्णांना आरोग्य विभागाकडून मिळालेली वागणूक, नाइलाजास्तव रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला. त्यात रुग्णाची कोट्यवधी रुपयांची लूट झाली. त्यामुळे शासकीय कोविड सेंटर पूर्ववत सुरु करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.
रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या सूचना
प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चिचोंडी पाटील कोविड सेंटरची पाहणी केली. ऑक्सीजन बेड वाढवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगली वागणूक द्या. योग्य मार्गदर्शन करा, अॅडमिट करून घ्या. याबाबत सूचना दिल्या आहेत. तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावाही घेतला आहे, अशी माहिती पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिली आहे.
COMMENTS