प्रतिनिधी : निंबळक (ता. नगर ) ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ सदस्य विलासराव भाऊसाहेब लामखडे यांचे आज सोमवारी( दि. १२ ) सकाळी हृदयविक...
प्रतिनिधी :
निंबळक (ता. नगर ) ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ सदस्य विलासराव भाऊसाहेब लामखडे यांचे आज सोमवारी( दि. १२ ) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी १ वाजता निंबळक स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांचे व्याही आणि उद्योजक शरद ठाणगे यांनी सोशल मिडियावर दिली आहे. त्यांच्या अवेळी जाण्याने निंबळकसह परिसरावर शोककळा पसरली आहे. अनेकांना तर त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वासही बसत नाही.
निंबळक गावच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून ते सक्रीय होते. त्यामुळे त्यांचा गावासह तालुक्यात दांडगा जनसंपर्क निर्माण झाला आहे. अनेकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी निर्माण करून ते टिकवले होते, त्यामुळेच तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त केली आहे.
निंबळक गावची धुरा त्यांनी गेली समर्थपणे पेलली. त्यांच्या पश्चात मोठा गोतावळा आहे. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांचे ते बंधू होत तर सरपंच प्रियंका लामखडे यांचे ते सासरे होते.
COMMENTS