अहमदनगर : जिल्ह्यातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या कल जाणून घेण्यासह समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणून 'कृषीरंग' व 'राज्यकर्ता&...
अहमदनगर :
जिल्ह्यातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या कल जाणून घेण्यासह समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणून 'कृषीरंग' व 'राज्यकर्ता' या दोन न्यूज पोर्टलने सर्वेक्षण हाती घेतले होते. दि. 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत झालेल्या या ऑनलाईन सर्वेक्षणात नगर जिल्ह्यातील 990 फेसबुक व गुगल युझर्सने सहभाग घेतला. सर्व तालुक्यातील आणि सर्व वयोगटातील युझर्सने यामध्ये आपले मत व्यक्त केले आहे. त्याचाच सर्वेक्षण अहवाल उद्यापासून सविस्तरपणे प्रसिद्ध केला जाणार आहे.
हा आहे 'अहमदनगर'चा दृष्टीकोन - ‘अहमदनगर जिल्हा राजकीय - सामाजिक सर्वेक्षण 2021’च्या अहवालात 990 युझर्सचा सहभाग
या सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे असे :
1. नगर जिल्ह्यातील 990 फेसबुक व गुगल युझर्सचा सहभाग
2. दि. 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत झाले ऑनलाईन पद्धातीने सर्वेक्षण
3. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका व नगरपालिका स्तरावरील नागरिकांचा सहभाग
4. जिल्ह्यातील झालेली विकासकामे आणि त्यामध्ये राहिलेल्या त्रुटींवरही नागरिकांनी मांडले मत
5. खासदार, स्थानिक आमदार, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, व ग्रामपंचायत स्तरावरील नेतृत्वाबद्दलही नागरिकांनी मांडले स्पष्ट मत
6. पुढील निवडणुकीत मतदान करताना कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार यावरही टाकला नागरिकांनी प्रकाशझोत
7. राज्य व देशपातळीवर सुरू असलेल्या राजकीय, आर्थिक व सामाजिक घडामोडींवरही व्यक्त केले मत
सर्वेक्षणात विधानसभा मतदारसंघनिहाय सहभागी झालेले नागरिक असे :
विधानसभा मतदारसंघ नाव सहभागी युझर्स
पारनेर-नगर 98
श्रीगोंदा 95
अहमदनगर 109
कर्जत-जामखेड 87
शेवगाव-पाथर्डी 74
नेवासा 83
श्रीरामपूर 76
राहता (शिर्डी) 86
कोपरगाव 58
संगमनेर 64
अकोले 59
राहुरी 101
एकूण 990
पुढील भागात याच सर्वेक्षणातील तालुकानिहाय राजकीय आणि सामाजिक परिस्थिती नेमकी काय आहे, याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाणर आहे. लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी आणि कर्तव्ये नेटके पणाने पार पाडतात का, जनतेच्या परीक्षेत नेते पास की नापास हेही लवकरच कळणार आहे. या सर्वेक्षणातील काही बाबी गांभीर्याने घेणे गरजेच्या आहेत. आगामी निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद पडले तर नवल वाटू नये. त्यामुळे आपल्या भागात काय आहे राजकीय स्थिती जाणून घेण्यसाठी https://www.rajyakarta.in/ या लिंकवर आम्हाला फोलो करा. किंवा https://chat.whatsapp.com/IzKZeji3gjqFQEH5XU6Njq या लिंकवर जाऊन राज्यकर्ता च्या अपडेट्स मिळवत राहा.
COMMENTS