अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पार पडल्याने गावोगावच्या नेते मंडळींना सोसायटी निवडणुकीचे वेध लागले होते. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीह...
अहमदनगर :
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पार पडल्याने गावोगावच्या नेते मंडळींना सोसायटी निवडणुकीचे वेध लागले होते. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही करण्यात आली होती. तसेच अहमदनगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेची मुदतही या काळात संपत आहे. शिक्षक नेत्यांनीही वार्षिक सर्व साधारण सभेत निवडणूकीची तालीम घेऊन टाकली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवातही झाली होती. मात्र, ऐनवेळी शासनाकडून ‘या’ निवडणुका पुढे ढकलल्यामुळे त्यांचाही हिरमोड झाला आहे. गावकीच्या राजकारणात महत्वाचे स्थान असणारी सेवा सोसायटी निवडणुकाही ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे गाव पुढाऱ्यांच्या आनंदावरही विरजण पडले आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे २ हजारांवर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. राज्यभरात लॉकडाऊन सदृश्यस्थिती निर्माण झाल्याने राज्यभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ठकलण्याचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या जिल्ह्यातील शिक्षक बँकेसह विविध सहकारी बँकेच्या निवडणुकांनाही तुर्तास ‘ब्रेक’ लागला आहे.
राज्य सरकारकडे नैसर्गीक आपत्तीच्या कालावधीत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणुंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत १८ मार्च २०२०, १७ जून, २८ सप्टेंबर, ३१ डिसेंबर २०२० तसेच १६ जानेवारी, २४ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशानुसार कोरोनामुळेच ३१ मार्चपर्यंत २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती.
कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर शासनाने न्यायालयाने ज्या संस्थांना निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते, त्या संस्था वगळून इतर संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यात डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपणाऱ्या दीड हजारांवर संस्था आहेत, तसेच २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या संस्थांची संख्याही मोठी आहे.
COMMENTS