मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेमेडिसिव्हिर इंजेक्शनसह व्हेंटीलेटर आणि बेड्सची कमतरता भासत आहे. रुग्...
मुंबई :
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेमेडिसिव्हिर इंजेक्शनसह व्हेंटीलेटर आणि बेड्सची कमतरता भासत आहे. रुग्णांना होणारा ऑक्सिजन पुरवठाही विस्कळीत झाला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे औद्योगिक कामासाठीचा ऑक्सिजनचा पुरवठा थांबविण्याचे निर्देश आज देण्यात आले आहेत. जोपर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार नाही, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री शिंगणे म्हणाले की, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रुग्ण संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे औद्योगिक कामांसाठी लागणारा ऑक्सिजन पुरवठा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती आटोक्यात आली की पुरवठा सुरळीत केला जाईल.
प्रत्येक जिल्ह्याला पुरेल इतक्या ऑक्सिजन निर्मिती करण्याबाबत कंपन्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होईल. ज्या जिल्ह्यात वाहतुकीची सोय नसेल त्यासाठी वाहतुकीची सोय करण्यात येईल. त्यासाठी विशेष तरतूद करण्यात येईल, असे मंत्री शिंगणे यांनी स्पष्ट केले.
COMMENTS