पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधणारे वक्तव्य केले आहे. सांगलीत पत्रकारांशी बोलत ...
पुणे :
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधणारे वक्तव्य केले आहे. सांगलीत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी वाढते करोना रुग्ण आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूबाबत गंभीर असे विधान केले आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात ते ट्रेंडमध्ये आलेले आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे. कोरोनाचा फैलाव वाढल असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मुळात कोरोना हा रोगच नाही आहे. कोरोना हा मानसिक आजार आहे. यामुळे काही होत नाही. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत.
दारुची दुकानं उघडी आहेत. त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी इतर काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, असेही भिडे यांनी म्हटलेले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. अगोदरही त्यांनी एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला होता.
अशा पद्धतीने भिडे यांनी पुन्हा एकदा करोना आणि त्यावर भाष्य केले आहे. करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत, असे ते म्हटल्याने अनेकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
COMMENTS