पुणे : बनावट संकेतस्थळाद्वारे प्रादेशिक सेनेबाबत भरती प्रक्रिया जाहीर करून त्या जाहिरातीच्या आधारे सुमारे ७० तरुणांची फसवणूक करणारे रॅकेट ...
पुणे : बनावट संकेतस्थळाद्वारे प्रादेशिक सेनेबाबत भरती प्रक्रिया जाहीर करून त्या जाहिरातीच्या आधारे सुमारे ७० तरुणांची फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आलेले आहे. सोलापूर, सातारा आणि लखनौ येथील आरोपींनी या तरुणांना तब्बल साडेतीन कोटी रुपयांना लुटले आहे. रॅकेट देशात सक्रीस असण्याची शक्यता असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.
भारतीय लष्कराचे दक्षिण मुख्यालय आणि पुणे पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारत कृष्णा काटे (४१, रा. राजुरे, सांगोला, जि. सोलापूर), राजेंद्र दिनकर संकपाळ (रा. सातारा), दयानंद जाधव आणि बी. के. सिंग (रा. लखनऊ, उत्तरप्रदेश राज्य) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यंत्रणा अधिक तपास करीत आहे. सलमान गौसोद्दीन शेख (२१, रा. करडखेल, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हे बनावट भरती रॅकेट उघडकीस आलेले आहे.
सलमान, शिवाजी जाधव आणि नवनाथ जाधव यांना लष्करामध्ये भरती करण्यासाठी ६ लाख आणि फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून भरती करण्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी आरोपींनी केली होती. हेडक्वॉर्टर आर्मी या नावाने बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे चौघांकडून १३ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना बनावट नियुक्तिपत्रही देण्याची किमया आरोपींनी केली होती. लष्कर भरतीसाठीच्या उमेदवारांना विमानाने दिल्ली, कोलकाता, जबलपूर याठिकाणी नेऊन त्याठिकाणी लेखी परीक्षा घेऊन तसेच एखाद्या डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी केली. याकरिता उमेदवारांकडून विमान खर्च, लॉजिग, बोर्डिंग खर्च घेतला गेला.
COMMENTS