मुंबई : रॉयल एनफील्डने (Royal Enfield) आपल्या सर्वाधिक विक्री असलेल्या क्लासिक 350 (Classic 350)मॉडेलच्या किंमती वाढवल्या आहेत. वाढलेल्या...
मुंबई :
रॉयल एनफील्डने (Royal Enfield) आपल्या सर्वाधिक विक्री असलेल्या क्लासिक 350 (Classic 350)मॉडेलच्या किंमती वाढवल्या आहेत. वाढलेल्या किंमतींमुळे क्लासिक 350 ने प्रथमच 2 लाख रुपयांचा आकडा (एक्स-शोरूम) ओलांडला आहे. तसे पाहता, चेस्टनट रेड, एएसेच, मर्क्युरी सिल्व्हर, Redditch Red या सर्वांत स्वस्तातील सिंगल चॅनल एबीएस व्हेरिएंटची किंमत आता 1,79,782 रुपये आहे. त्याची आधीची किंमत 1,72,466 रुपये होती. या व्हेरिएंटची किंमत 7,316 रुपयांनी वाढली आहे. त्याशिवाय अन्य अधिक सुरक्षित ड्युअल चॅनल एबीएस व्हेरिएंट्स क्लासिक ब्लॅक, प्युअर ब्लॅक आणि मर्क्युरी सिल्व्हर कलर ऑप्शन्सची प्रारंभिक किंमत आता 1,88,531 रुपयांवर गेली आहे. पूर्वी त्याची किंमत 1,80,880 रुपये होती. या प्रकारातील बाईक्स 7,651 रुपयांनी महागली आहे.
बाजारात कच्चामाल आणि वाहतूक दरात वाढ झाली आहे. धातू व खनिजांच्या किंमतीही वधारल्या असल्याने कंपनी व्यवस्थापनाने सर्वच व्हेरिएंटच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
8,362 रुपयांची सर्वाधिक वाढ...
गनमेंटल ग्रे (ड्युअल चॅनेल एबीएस अॅकलोय व्हील्ससह) कलर बुलेट आता शोरूममध्ये २,०३,४८० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी त्याच बाईकची किंमत 1,95,252 होती. या कलर ऑप्शनची किंमत 8,228 रुपयांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे Royal Enfield Classic 350 च्या स्टिल्थ ब्लॅक आणि क्रोम ब्लॅक कलर ऑप्शन्स मधील ड्युअल चॅनल एबीएस व्हेरिएंटची किंमत सर्वाधिक ८,३६२ रुपयांनी वाढली आहे. हा कलर व्हेरिएंट शोरूममध्ये 2,06,962 रुपयांना उपलब्ध आहे. पूर्वी त्याची किंमत 1,98,600 रुपये होती.
Classic 350 चे व्हेरिएंट आणि किंमती खालीलप्रमाणे आहेतः
दुसरीकडे ड्युअल चॅनल एबीएस व्हेरिएंटच्या ऑरेंज एम्बर (Orange Ember) आणि मेटॅलो सिल्व्हर (Metallo Silver ) कलर ऑप्शन्सची किंमत आता 2,03,480 रुपये आहे. पूर्वी त्याची किंमत 1,95,252 रुपये होती. या व्हेरिएंटच्या किंमतीत 8,228 रुपयांची वाढ झाली आहे. क्लासिक 350 हे कंपनीचे सर्वोत्कृष्ट विक्रीचे उत्पादन आहे, जर किंमत अशीच वाढत राहिली तर त्याचा ग्राहकांवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.
COMMENTS