मुंबई : राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभर ढगाळ हवामान असते. मात्र, पाऊस काही होत नाही अशी परिस्थिती आहे. आता म...
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभर ढगाळ हवामान असते. मात्र, पाऊस काही होत नाही अशी परिस्थिती आहे. आता मात्र राज्याच पुन्हा पावसाची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण, हवामान विभागाने पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात 15 ऑगस्टनंतर मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात तर पाऊस होणार आहेच याशिवाय विदर्भ आणि मराठवाडा परिसरात चांगला पाऊस होईल. याआधी विदर्भ आणि मराठवाडा परिसरात फारसा पाऊस पडला नव्हता.
राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. कुठेही फारसा पाऊस पडलेला नाही. मात्र येत्या काही दिवसात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील आतापर्यंतच्या पावसाचा अंदाज घेतला तर समाधानकारक पाऊस पडला आहे. मात्र, पावसाचे वितरण असमान आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात अगदीच तुरळक पावसाची नोंद आहे. धुळे, जळगाव आणि नंदूरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. हजारो गावातील लोक पाण्यात अडकले आहेत. शिवपुरी, दतिया, ग्वालीयर मध्ये मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. यासाठी सैन्याची मदत घेण्यात येत आहे.
सध्या राज्यातील तब्बल 1171 गावे महापूर आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडली आहेत. उत्तर भारतात मात्र पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांना पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. एकट्या मध्य प्रदेश राज्यात तब्बल 1200 गावे जलमय झाली आहेत. सध्या पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात मुसळधार पाऊस होत आहे.
COMMENTS