Advt

advt top 2

जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेळकेंना रस्ता सुधार समितीचा घेराव; रस्ता दुरुस्तीसाठी उपाध्यक्षांच्या सूचना.

  जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना इसळक – खातगाव रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी रस्ता सुधार समितीच्या वतीने निवेदन देण्यात ...

 

जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना इसळक – खातगाव रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी रस्ता सुधार समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष संदीप गेरंगे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.  

प्रतिनिधी : अहमदनगर (Rajyakarta News Impact)

इसळक – खातगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी सात सदस्यीय समितीची स्थापना करत जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना घेराव घातला. उपाध्यक्ष शेळकेंनी हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून मार्गी लागणार असल्याची शेतकऱ्यांना माहिती दिली. मात्र, रस्त्याची पाहणी करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली. त्यांनी पाहणी करून या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्याच्या डागडुजीसाठी आणि बाभळी काढण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून प्रशासकीय अधिकार्यांना सूचना देखील केल्या आहेत. 

 इसळक – खातगाव रस्त्याबाबत राज्यकर्ताने दि. २४ ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. शेतकरी संघटनेचे नेते संदीप गेरंगे यांनी सोशलमिडीयावर याबाबत पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती. शिवाय आगमी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अध्यक्ष गेरंगे यांनी  परिसरातील शेतकर्यांना सोबत घेत ‘इसळक – खातगाव रस्ता सुधार समिती’ची स्थापना करून उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना शनिवारी  (दि. २८ ऑगस्ट ) निवेदन दिले आहे. 

https://bit.ly/3sIWJIz 

उपाध्यक्षांना दिलेल्या निवेदनात, रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधतानाच सदर रस्ता दोन महिन्यांच्या आत दुरुस्त करण्यात यावा. अन्यथा समितीच्या वतीने लोकवर्गणी करून रस्त्याची डागडुजी केली जाईल, आणि गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष, संदीप गेरंगे, उपाध्यक्ष योगेश गेरंगे, सचिव पोपट गाडगे तसेच शिवाजी चव्हाण, योगेश चोथे, शरद वाबळे, विजय खामकर आदी सदस्यांनी सह्या केल्या आहेत. यावेळी समिती सदस्यांसह कैलास लांडे, किसन चव्हाण, संजय खामकर, गोरख चव्हाण, पोपट तांबे, उत्तम खामकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

प्रमुख रस्त्यांचे काम तातडीने मार्गी लावणार : शेळके 

इसळक – खातगाव रस्ता पंतप्रधान सडक योजनेत वर्ग झाल्याने तूर्तास निधी टाकणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी दिली. त्याचबरोबर हिंगणगाव- खारे कर्जुने आणि खातगाव – खारे कर्जुने हे दोन प्रमुख या रस्त्यांची कामेही पुढील काही दिवसांत मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेळकेंना रस्ता सुधार समितीचा घेराव; रस्ता दुरुस्तीसाठी उपाध्यक्षांच्या सूचना.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेळकेंना रस्ता सुधार समितीचा घेराव; रस्ता दुरुस्तीसाठी उपाध्यक्षांच्या सूचना.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVIpZvu5iWKQrQYlQ7JV3XuRhsaKu5BVLiavFjqY7bCIR_UbNNP7sV1QtTvP8OHK1KHt0Ci1Wuo0TwuvCkLXau16hX_V6Azl0_ZD_CE9M3Cg8FhEbShZ0hXY__Oyt0veyuBe2tO4RuGf0r/s320/%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25A8+%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258B%25E0%25A4%259F%25E0%25A5%258B+.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVIpZvu5iWKQrQYlQ7JV3XuRhsaKu5BVLiavFjqY7bCIR_UbNNP7sV1QtTvP8OHK1KHt0Ci1Wuo0TwuvCkLXau16hX_V6Azl0_ZD_CE9M3Cg8FhEbShZ0hXY__Oyt0veyuBe2tO4RuGf0r/s72-c/%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25A8+%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258B%25E0%25A4%259F%25E0%25A5%258B+.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_15.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_15.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content