हस्तिदंत : संग्रहित छायाचित्र. मुंबई : मुंबई पोलिसांनी घाटकोपर परिसरात हत्तीचे दात विकणाऱ्या दोन तस्करांना अटक केली आहे. दीपक कुमार प्रभ...
हस्तिदंत : संग्रहित छायाचित्र.
मुंबई :
मुंबई पोलिसांनी घाटकोपर परिसरात हत्तीचे दात विकणाऱ्या दोन तस्करांना अटक केली आहे. दीपक कुमार प्रभुदयाल वैष्णव आणि मोहम्मद फिरोज हाफिज शेख अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक महेश शेलार यांना दोन व्यक्ती घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ हस्तिदंत विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या हस्तिदंताची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. दोन्ही आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा दात कोठून आणला गेला आणि कोणाकडे विकायचा यासंबधित पुढील तपास घाटकोपर पोलीस करत आहेत. पोलिस अटक करण्यात आलेल्या आरोपींचे जुने गुन्हेगारी रेकॉर्ड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
याबाबत नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे. खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता.
https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/crime/mumbai-police-arrests-ivory-smugglers-red-handed-from-ghatkopar-area/videoshow/85171953.cms
COMMENTS