स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा उपक्रम रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन अभिनाथ शिंदे, उपप्राचार्य बाळासाहेब सागडे ...
स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा उपक्रम
![]() |
रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन अभिनाथ शिंदे, उपप्राचार्य बाळासाहेब सागडे यांच्या समवेत स्वयंभू चे पदाधिकारी. |
प्रतिनिधी : अहमदनगर
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक जण सार्वजनिक सुट्टीचा आनंद घेण्यात धन्यता मानतात. मात्र, स्वयंभूच्या युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक भान जोपासले आहे, असे मत व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन अभिनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
स्वयंभू युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शहरातील न्यू आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटक अभिनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापून रक्तदानास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य बाळासाहेब सागडे हे होते.
शिंदे पुढे बोलतांना म्हणाले की, स्वयंभू युवा प्रतिष्ठान गेल्या ४ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे विविध उपक्रमातून तरुणांची सामाजिक जाण अधोरेखित होत आहे. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने ही तुट भरून निघण्यास मदत होईल.
प्रतिष्ठानचे संस्थापक पांडुरंग काळे यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. कोरोनाच्या संकटात सुमारे ९०० हून अधिक रुग्णांना अडचणीच्या काळात रक्तपिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी प्रयत्न केले असल्याचे सचिव संतोष वाघ यांनी सांगितले.
‘मानवी शरीरातील रक्त कोणत्याही कारखान्यात उत्पादित केलं जाऊ शकत नाही. कोरोनाच्या संकटात स्वयंभूचे काम हे कौतुकास्पद आहे. त्यामुळेच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. युवकांनी रक्तदान चळवळीच्या माध्यमातून मोठी जीवित हानी टाळली आहे’, असे गौरवोद्गार उपप्राचार्य बाळासाहेब सागडे यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.
या शिबिरा प्रसंगी संजय लोळगे, विद्या जोशी, ओंकार काळे, ज्ञानेश्वर झाबंरे, भाग्यश्री आंधळे, वैष्णवी देसाई, यांसह स्वयंभु युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
We present high quality, absolutely interactive courses including videos, assignments and assessments. She was unchallenged by employees and aided by doorways left propped open by workers. Get More at Wildz by benefit of|benefiting from|profiting from} our Welcome Bonus, industry-leading reward program and easy website navigation. Built by a staff of dedicated industry professionals with a give attention to} pace, efficiency and dynamic rewards, Wildz is setting the 1xbet gold-standard for the modern-day on-line on line casino. Presently, a handful of revolutionary content material creators working in the Live Casino sphere get pleasure from something of a stranglehold on the industry.
उत्तर द्याहटवा