अहमदनगर : प्रतिनिधी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडीयो क्लीपवरून राज्यात राजकारण चांगलेच तापलेले आहे. याप्रकरणी भाजपाच्या उपाध्...
अहमदनगर : प्रतिनिधी
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडीयो क्लीपवरून राज्यात राजकारण चांगलेच तापलेले आहे. याप्रकरणी भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. ह्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यातच चित्रा वाघ यांनी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील लिपिकास मारहाण झाल्याच्या प्रकरणाचा पुनरुच्चार केला आहे.
चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. त्या पत्रात आ. लंकेंनी लिपिकास मारहाण केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच डॉ. उंद्रे आणि डॉ. अडसूळ यांना शिवीगाळ केली असल्याची तक्रार होती. या पत्राची प्रत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आली होती.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1428705847165677573?s=20
चित्रा वाघ यांनी जिल्हाधिकारी आणि नगर पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली आहे, याचा खुलासा करण्याचे आवाहन केले आहे. आ. लंकेंनी ह्या प्रकरणी लिपिक राहुल पाटील यांचा खुलाशाचा व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यामुळे त्यावर पडदा पडला होता. मात्र, वाघ यांनी हे प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी केल्याने पुन्हा चर्चेत येत आहे.
राज्यात आमदार नीलेश लंकेंची लोकप्रियता शिगेला असताना त्यांच्यावर हे गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता आहे.
Play casino - No.1 for the Casino Guru
उत्तर द्याहटवाNo longer have the poormansguidetocasinogambling opportunity to go to the 출장샵 casinos or read https://septcasino.com/review/merit-casino/ the reviews of the slots you love. But they're not always the same. Sometimes you have sol.edu.kg a new online https://deccasino.com/review/merit-casino/