मदतकार्यात सहभागी स्वयंभू परिवार. प्रतिनिधी : अहमदनगर येथील स्वयंभू युवा प्रतिष्ठाण व एन.एस. एस. ओ अहमदनगर यांनी पूरग्रस्त भागातील नागरिक...
मदतकार्यात सहभागी स्वयंभू परिवार. |
प्रतिनिधी : अहमदनगर
येथील स्वयंभू युवा प्रतिष्ठाण व एन.एस. एस. ओ अहमदनगर यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहच करत दिलासा दिला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने हाळ (ता. वाळवा, जि. सांगली) या गावी पुरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक किराणा वस्तूंसह पाणी बॉक्सचे वाटप करण्यात आले. शनिवारी (दि. ७ ऑगस्ट) ही मदत पूरग्रस्तांना सुपूर्द करण्यात आली.
सध्या महाराष्ट्र महापुराच्या नैसर्गिक आपत्तीशी लढा देत आहे. पुरस्थितीने प्रामुख्याने ठाणे,चिपळूण, कोकण, याभागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. माध्यमांच्या आणि सरकारी पथकांच्या नजरेत हा भाग प्रथम आल्याने या भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. परंतु, या महापुराचा फटका सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसला. ही गावे पाण्याखाली आसताना सुध्दा त्यांना आजपर्यंत सरकारकडून किंवा इतर कुणाचीही मदत पोहचली नाही. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते किरण पाटील यांच्या मार्फत समजली.
ही माहिती समजताच स्वयंभू प्रतिष्ठानच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतनिधी संकलनाचे काम हाती घेतले. केवळ आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. अहमदनगर जिल्ह्यातील स्वयंभू परिवार एकजुटीने या मदतकार्यात सहभागी झाला. हाळ या गावच्या परिसरातील १२० कुटुंबियांना 'रिलीफ किट'सह पाणी बॉक्स व कपड्याचे वितरण करण्यात आले.
यांनी बजावली महत्वाची भूमिका...
या मदत कार्यासाठी जिल्हा गुरुकुल शिक्षक मंडळ अहमदनगर,मेड बाजार अहमदनगर, मेड वर्ल्ड फार्मा अहमदनगर, कोथुळ ग्रामस्थ श्रीगोंदा, शारदा विद्या निकेतन 10 वी बॅच श्रीगोंदा, प्रयास फौंडेशन देवळाली प्रवरा, डॉ, बाळासाहेब सागडे सर, श्रीम. भारती इंगवले, प्रा. छाया खेडकर मॅडम, स्वयंभू युवा प्रतिष्ठाण परिवार तसेच एन.एस. एस. ओ परिवार अहमदनगर यांनी सहकार्य केले.
'स्वयंभू'च्या तरुणांना सामाजिक जाणिव : प्रा. दानवे
महाविद्यालयीन तरुण - तरुणींनी एकत्र येत स्वयंभूची स्थापना केली आहे. रक्तदान चळवळ उभी करून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या या तरुणांना सामाजिक जाणिव असल्याने संकटात असणाऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा 'पिंड' आहे. त्यातूनच ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरांनी समाजात चांगली पिढी निर्माण केली आहे. त्याच योजनेची जबाबदारी स्वीकारली असल्याने स्वयंभूचे काम पाहून अभिमान वाटतो, असे मत प्रा. भारती दानवे यांनी व्यक्त केले.
COMMENTS