लसीकरण जनजागृतीसाठी लावण्यात आलेल्या फलकावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडण्यात आला आहे. प्रतिनिधी : अहमदनगर कोरोना लसीकरणाच्य...
लसीकरण जनजागृतीसाठी लावण्यात आलेल्या फलकावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडण्यात आला आहे. |
प्रतिनिधी : अहमदनगर
कोरोना लसीकरणाच्या जनजागृती संदर्भात लावण्यात आलेल्या (बॅनर) फलकावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडून छेडछाड करून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका पंचायत समितीच्या आवारात हा फलक लावण्यात आला होता. शासकीय कार्यालयाच्या आवारात घुसून काही समाजकंटकांनी हा प्रकार केला आहे.
असे गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटकावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात तोडफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी गटविकास अधिकारी श्री.घाडगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
ह्या फलकावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडण्यात आला आहे. |
या घटनेकडे भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी लक्ष वेधले आहे. गटविकास अधिकारी यांना गेल्या १०-१५ दिवसांपूर्वी कल्पना देऊन देखील त्यांनी सदर गोष्ट गांभीर्याने घेतली नाही याचे विशेष वाटते, गटविकास अधिकारी यांना जर देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीची किम्मत नसेल तर त्यांना त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, इतर कोणत्याही फोटोला काही न होता फक्त मोदी याच्या फोटोची विटंबना कसकाय झाली, जे पंचायत समितीचे सदस्य गावोगावी लसीकरणाचे डोस देत फिरले त्यांना ज्यांनी लस उपलब्ध करून दिली त्यांची विटंबना दिसली नाही काय हे सर्व जाणूनबुजून केलेले कृत्य असून या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने पंचायत समितीमध्ये तीव्र स्वरूपाचे तोडफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कोकाटे यांनी दिला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटोची विटंबना करून गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटकावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी केली आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्ते. |
यावेळी निषेध व्यक्त करताना पंचायत समिती सदस्य दिपक कार्ले, दरेवाडीचे सरपंच सुभाष बेरड, दशमी गव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे, तालुका सरचिटणीस गणेश भालसिंग, बाप्पूसाहेब बेरड, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, राजेंद्र दारकुंडे, पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, विजय गाडे, भाऊसाहेब बेल्हेकर, संतोष कोकाटे, बाप्पूसाहेब कोकाटे यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS