Mahindra Car Offers : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) आपल्या वाहनांवर मोठी सूट देत आहे. अन...
Mahindra Car Offers : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) आपल्या वाहनांवर मोठी सूट देत आहे. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहे. असे असतानाही महिंद्रा आपली विक्री वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात आपल्या निवडक मॉडेल्सवर अतिशय आकर्षक सूट आणि ऑफर देत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वापरासाठीच्या एसयूव्हीवर 2.56 लाख रुपयांपर्यंत प्रचंड सूट देत आहे.
या ऑफर अंतर्गत, कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि इतर अतिरिक्त फायदे ह्यात समाविष्ट आहेत. कंपनीची ही योजना 31 ऑगस्ट पर्यंत लागू आहे. कंपनीने अनेक गाड्यांच्या खरेदीवर आकर्षक सवलती आणि सुट दिली असली तरी हॉट सेलिंग एसयूव्ही थार ( SUV THAR) आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या XUV700 वर कोणतीही सूट दिली जात नाही.
नव्याने कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्ही महिंद्राच्या कार खरेदीवर 2.56 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.
अशी आहे ऑफर !
महिंद्राची XUV500 खरेदी केल्यास एकूण 2.56 लाख रुपयांची बचत होईल. कंपनीच्या ऑफरनुसार 1.79 लाख रुपयांची रोख सवलत, 50,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, XUV500 वर 6,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे. कंपनी नवीन जनरेशन XUV500 लाँच करण्याची तयारी करत आहे. सध्याच्या महिंद्रा एक्सयूव्ही 500 ची एक्स-शोरूम किंमत 17 लाख रुपयांपासून 23.77 लाखांपर्यंत आहे.
COMMENTS