मुंबई : मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या वोडाफोन आयडियाला (VIL) वाचवण्याच्या आटोकाट प्रयत्न करून अखेरीस हताश झालेल्या आदित्य बिर्ला समूहाचे अ...
बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना 7 जून रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘मी कंपनीतील माझा हिस्सा सार्वजनिक क्षेत्र, सरकार, देशांतर्गत वित्तीय संस्था यापैकी कोणत्याही संस्थेला देण्यास तयार आहे. किंवा सरकारची मर्जी असणाऱ्या कंपनीलाही देण्यास तयार आहे.’
व्होडाफोन-आयडीया कंपनीचे ग्रह सध्या फिरले आहेत. सततचा तोटा आणि एजीआर शुल्क थकबाकी अशा संकटांनी घेरलेल्या कंपनीच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण, कंपनीचे भारतातील अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाने सुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारला असून तसे शेअर बाजारास कळवले आहे.
वोडाफोन आयडीया सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहे. वोडाफोन-आयडीयाची पालक कंपनी असलेल्या ब्रिटनमधील वोडाफोन ग्रुपनेही नव्याने गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. त्यातच कंपनीची सेवा अखंडीत सुरू रहावी यासाठी स्वतःच्या हिश्श्याची विक्री करण्यास तयार असलेल्या बिर्ला यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता कंपनी व्यवस्थापनाच्या अडचणी वाढणार आहेत. बिर्ला यांच्या जागी आता बिगर कार्यकारी संचालक हिमांशु कपाडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कंपनीवरील आर्थिक संकट दूर करण्याच्या उद्देशाने स्वतःकडील 27 टक्के हिस्सेदारी विक्रीस परवानगी देण्याची मागणी बिर्ला यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, केंद्राने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बिर्ला यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. वोडाफोन आयडीयाचे बाजार भांडवल जवळपास 24000 कोटी रुपयांचे आहे. मागील काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकणे म्हणजे मोठे आव्हान आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात सेवा देणे कंपनीस दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. या स्पर्धेत कंपनी टिकाव धरू शकलेली नाही. त्यामुळे कंपनीचे भवितव्य डळमळीत झाले आहे. सातत्याने वाढणारा तोटा आणि एजीआर शुल्क थकबाकी यामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती आधिकच खालावली आहे. कंपनीचे शेअर्सने गडगडले आहेत.
COMMENTS