कोकणातील पूरग्रस्तांना मदत सुपूर्द करतांना अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे व इतर सहकारी. ...
कोकणातील पूरग्रस्तांना मदत सुपूर्द करतांना अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे व इतर सहकारी. |
पारनेर : प्रतिनिधी (श्री. गणेश जगदाळे )
लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक विचार प्रेरणेतून काम करत असलेल्या अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे या नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत आहेत. महाराष्ट्रात संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करणे, आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. ही सामाजिक भावना मनात ठेवून पूरग्रस्त भागाला मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार मदत संकलनासाठी राजेश्वरीताई कोठावळे यांनी आवाहन केले.त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली. लहान मुलांचे कपडे महिलांच्या साड्या तसेच धान्य, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, आणि इतर किराणा मालाचे मोठ्याप्रमाणात संकलन झाले. जमा झालेल्या वस्तू नुकत्याच कोठावळे यांनी पूरग्रस्तांना सुपूर्द केल्या. कोकणातील चिपळूण परिसरातील सुमारे १ हजार कुटुंबाना मदत पोहच करत मोठा आधार दिला आहे. त्यामुळे राजेश्वरी कोठावळे यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
यांचे लाभले सहकार्य...
म्हसोबाझाप ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच प्रकाश गाजरे, संजयदादा बाबर व अंकुशदादा बाबर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रवींद्र गायखे, पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस निलेश पठारे, उद्योजक सुधीर इंगळे तसेच पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या नेत्या मायाताई रोकडे, राष्ट्रवादी युवती पारनेर तालुका अध्यक्ष पुनमताई मुंगसे, सुपा ग्रामपंचायत सदस्या सुरेखाताई पवार उद्योजिका स्वातीताई इंगळे, मयुरी झरेकर, संजय गाडीलकर, यांनी मोठा सहभाग घेत मदत निधी जमा करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले.
आमदार निलेश लंके यांनी राजेश्वरी कोठावळे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांच्या कामातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन आमदार लंके यांनी केले आहे. सर्व सामाजिक कामांमध्ये अगदी बहिणीप्रमाणे पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या युवती सहकारी कर्जुले हर्या येथील मायाताई रोकडे या मदत व सहकार्य करत असल्याचे राजेश्वरी कोठावळे यांनी राज्यकर्ताशी बोलतांना सांगितले.
COMMENTS