मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेटीवर प्रतिक्रिया प्रतिनिधी : मुंबई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेटीवर प्रतिक्रिया
प्रतिनिधी : मुंबई
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी आज भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि देशातील विविध राजकीय आणि सामाजिक विषयांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1423535716861026306?s=20
या भेटीबाबत शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राउत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे काही पेगासिस नाही. त्यामुळे आम्ही कोण कुणाला भेटतंय यावर पाळत ठेवत नाही. हे काम केंद्रातल्या सरकारचं आहे देशात अजूनही लोकशाही आहे. त्यामुळे कुणीही कुणाला भेटू शकतात.
राजकीय विषयाचे अभ्यासक व पत्रकार प्रशांत कदम यांनी खा. राउत यांची प्रतिक्रिया ट्विट केली आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1423504201636843521?s=20
COMMENTS