प्रतिनिधी : अहमदनगर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत कोविड १९ च्या लसीकरणाबाबत प्रश्नावरून पत्रकारांनी खुलासे विचारले. महापा...
प्रतिनिधी : अहमदनगर
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत कोविड १९ च्या लसीकरणाबाबत प्रश्नावरून पत्रकारांनी खुलासे विचारले. महापालिका प्रशासनाकडून लसीकरण कार्यक्रम राबविताना अनेक गडबडी झाल्या आहेत. तसेच काही ठिकाणांहून तर लस बाहेर विकली गेल्याबाबतचा प्रश्न दैनिक ‘सामना’चे पत्रकार मिलिंद देखणे यांनी उपस्थित केल्याने एकच गडबड उडाली आहे. याप्रकाराने महापालिकेचे आरोग्य अधिकारी चक्रावले आहेत.
पत्रकार मिलिंद देखणे यांनी थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा प्रश्न विचारल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत. आरोग्य अधिकारी श्री. राजूरकर यांनी मिलिंद देखणे यांना नोटीस बजावत संबधित प्रकरणी खुलासा मागविला आहे.
आरोग्य अधिकार्यांनी बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, ‘मनपाच्या लसीकरण केंद्रामधून लस बाहेर विकली जाते, असा प्रश्नवजा तक्रार आपण केली आहे. ही बाब आपण मनपा प्रशासनाच्या लक्षात आणून न देता थेटपणे पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत विचारणे उचित नाही. ही बाब आरोग्य कर्मचार्यांचे मनोबल व उत्साह खच्चीकरण करणारी आहे. आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती आणि पुरावे तीन दिवसांच्या आत सादर करावेत.’
COMMENTS