नवी दिल्ली : आज , 9 ऑगस्ट, सोमवारचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. वास्तविक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisaan) योजनेअंत...
नवी दिल्ली :
आज , 9 ऑगस्ट, सोमवारचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. वास्तविक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisaan) योजनेअंतर्गत नववा हप्ता (PM-Kisan 9th Installment) आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत. त्याद्वारे 9.75 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 19,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवली जाईल. कार्यक्रमादरम्यान, शेतकरी लाभार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच पंतप्रधान राष्ट्राला संबोधितही करतील. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमरही उपस्थित राहणार आहेत. जरी पीएम किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता दरवर्षी 1 एप्रिल रोजी येतो, परंतु यावेळी काहीसा उशीर झाला आहे. यावेळी हप्ता 4 महिन्यांपेक्षा जास्त उशीरा येत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 2000 रुपये दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
यादीत नाव नसल्यास तक्रार कोठे करावी?
जर तुमचे नाव यादीत नसेल, तर तुम्ही पीएम किसान सन्मानाच्या हेल्पलाईन 011-24300606 वर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता. पीएम किसान सन्मान योजनेमध्ये, सरकार 3 हप्त्यांमध्ये पैसे हस्तांतरित करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान, दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान पोहोचतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करा..
पीएम किसान योजनेत नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन करता येते. शेतकऱ्यांना हवे असल्यास, ते कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन नोंदणी करू शकतात, अन्यथा ते https://pmkisan.gov.in/ वरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ...
• Https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊन फार्मर्स कॉर्नरवर जा.
• 'नवीन शेतकरी नोंदणी' या पर्यायावर क्लिक करा.
• त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल. तसेच, कॅप्चा कोड प्रविष्ट करून, राज्य निवडावे लागेल आणि नंतर प्रक्रिया पुढे चालवावी लागेल.
• तुमच्या समोर येणाऱ्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहितीही भरावी लागेल.
• त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
मदतीसाठी हेल्पलाईन
शेतकरी पीएम किसान हेल्पलाइनवरून माहिती घेऊ शकतात आणि काही समस्या असल्यास तक्रारी नोंदवू शकतात. पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 आहे. याशिवाय, पीएम किसान टोल फ्री नंबर 18001155266 आणि पीएम किसान लँडलाइन नंबर 011-23381092, 23382401 देखील आहे. पीएम किसानची आणखी एक हेल्पलाईन 0120-6025109 आहे. ई-मेल आयडी pmkisan-ict@gov.in असून आपली तक्रार यावरही नोंदवू शकता.
COMMENTS