Advt

advt top 2

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी उद्योजक किशोर बियाणी यांच्या अडचणींची कथा वाचलीच पाहिजे

फ्युचर ग्रुपचे चेअरमन, उद्योजक किशोर बियाणी  मुंबई :   सध्या बाजारात मंदी सदृश परिस्थिती आहे. अनेकांच्या नोकऱ्या पणाला लागल्या आहेत. तर अनेक...


फ्युचर ग्रुपचे चेअरमन, उद्योजक किशोर बियाणी

 मुंबई : 

सध्या बाजारात मंदी सदृश परिस्थिती आहे. अनेकांच्या नोकऱ्या पणाला लागल्या आहेत. तर अनेकांनी यापूर्वीच गमावल्या आहेत. यातील काही मंडळींनी व्यवसायाची कास धरण्याचा विचार सुरु केला आहे. अनेक व्यावसायिक, उद्योजकांच्या यशकथा ऐकून भारावलेल्या नवव्यावसायिकांनी उद्योग सुरु करतांना खबरदारी घ्यायला हवी. व्यवसाय करू पाहताय काय? जरा थांबा, हे वाचा आणि मगच पुढे जा.. 

ही कहाणी आहे प्रसिद्ध उद्योगपती किशोर बिहाणी यांची. होय, ज्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी उद्योगजगताला दखल घ्यायला भाग पाडले होते. ज्यांच्या उद्योगाचे साम्राज्य ९ हजार कोटींपर्यंत वाढले असतानाही ५९ व्या वर्षी त्यांना हे सारे विकण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्यायच शिल्लक नाही. 

लोकांना फॅशनचे वेड लावणारे किशोर बियाणी अतिशय साधे जीवन जगतात. किशोर बियाणी अनेक ब्रँडचे मालक असूनही  वास्तविक जीवनात अतिशय साधी जीवनशैली जगण्यासाठी ओळखले जातात.

‘रिटेल जगताचे बादशहा’ म्हणून बियाणी यांना ओळखले जाते. 

रिटेल विक्रीची साखळी बाजारपेठेत आणणारे किशोर बियाणी हे असेच एक नाव आहे ज्यांनी भारतात रिटेल (किरकोळ विक्री ) विक्रीचे प्रणेते किंवा अग्रणी असे म्हणून संबोधले जाते. ‘रिटेल किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या किशोर बियाणी यांनी ग्राहकांना सहज व सोप्या खरेदीची सवय लावली. त्यांनी वेगवेगळ्या ऑफर आणि योजना आखत झपाट्याने विस्तार केला. सामान्य लोकांपर्यंत थेट पोहचण्यात त्यांचा हातखंडा होता. किशोर बियाणी यांनी ‘फ्युचर’ ग्रुपच्या फ्युचर रिटेल शॉप्सच्या माध्यमातून किरकोळ विक्री व्यवसायाचे संपूर्ण साम्राज्य देशभरात निर्माण केले. 



किशोर बियाणी यांचा जन्म 1 ऑगस्ट 1961 रोजी मुंबईस्थित कापड व्यापाऱ्याच्या घरात झाला. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या या पारंपारिक व्यवसायात खूप रस दाखवला. सन 1987 मध्ये किशोर बियाणी यांनी कपड्यांचा व्यवसायातून रेडिमेड कपडे निर्मितीत पदार्पण केले.

वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी निर्माण केला स्वतःचा ब्रँड!

सुरुवातीच्या काळात किशोर बियाणी यांना ‘स्टोन वॉश फॅब्रिक’च्या व्यवसायात बरेच यश मिळाले. ज्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. किशोर बियाणी त्यावेळी काहीतरी नवीन करण्याची संधी शोधत होते. त्यांना असे काहीतरी करायचे होते ज्याद्वारे देशभरातील जास्तीत जास्त लोकांशी थेट संपर्क साधून व्यवसायात आणखी प्रगती करण्याचा ते विचार करत होते. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी मेंझवेअर प्रायव्हेट लिमिटेड (Menzwear Private Limited) सुरू केले. व्यवसाय सुरू केल्यानंतर किशोर बियाणी यांनी वस्त्रोद्योग समजून घेण्यासाठी पाच वर्षे घालवली. किशोर बियाणी यांनी रेडिमेड कपड्यांचे उत्पादक म्हणून व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच त्यांनी स्वतःचे दोन ब्रॅण्ड सुरू केले.


पँटालूनचा उदय...

पुढील काही काळातच, किशोर बियाणीने आपल्या ब्रँडचे नाव बदलून पँटालून ठेवले. सन 1992 मध्ये, किशोर बियाणी यांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये पँटालूनची नोंदणी केली. जेणेकरून लोकांकडून काही पैसे जमा करून गुंतवणूक वाढून व्यवसाय वाढवीत नेला. यानंतर, किशोर बियाणी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी किरकोळ व्यवसायाची संपूर्ण इकोसिस्टम तयार केली होती. किशोर बियाणींनी कपड्यांच्या व्यवसायात एक क्रांतिकारी बदल घडवून आणला. नव्या युगात याला ‘फॅशन’चे नाव देण्यात आले. लोक टेलरकडे जाण्याऐवजी रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी रिटेल स्टोअरमध्ये जाऊ लागले. देशातील लोकांना ‘फॅशन’चे जणू त्यांनी वेडच लावले. 

फ्युचर ग्रुप स्टोअर्स

फ्युचर ग्रुपचे रिटेल स्टोअर - बिग बाजार 


फ्युचर ग्रुपने 2001 मध्ये बिग बाजारचे आपले पहिले स्टोअर उघडले. 2006 पर्यंत ते 56 पर्यंत वाढले आणि 2008 पर्यंत ते 116 झाले. 2008 च्या मंदीचा कंपनीवर वाईट परिणाम झाला असला तरी कंपनी वाढतच राहिली. दरवर्षी नवीन दुकाने उघडत राहिली आणि 2019 पर्यंत हा आकडा 295 पर्यंत वाढत गेला. किशोर बियाणी यांनी संपूर्ण बाजार भारतीय मध्यमवर्गाला एका छताखाली दिला. बिग बाजारला भारताचा ‘वॉलमार्ट’ म्हणूनही ओळखला जाऊ लागले होते. 

मात्र, गेल्या काही वर्षांतील फ्युचर ग्रुपची वाटचाल काही समाधानकारक नाही. कंपनीच्या अडचणीत वाढ झाल्याने प्रकरण थेट  कोर्टात पोहचले. बाजारातील मूल्य कोसळले. हजारो कोटींचा फटका किशोर बियाणी यांच्यासह गुंतवणूकदारांना बसला आहे. त्यातूनच बियाणी यांनी उभे केलेले 9 हजार कोटींचे साम्राज्य विकण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. 

त्यामुळे व्यवसायात अत्यंत सावधगिरीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. एखादा जरी निर्णय चुकला तरी होत्याचे नव्हते व्हायला फार वेळ लागत नाही. 

माहिती संकलन व  शब्दांकन : महादेव गवळी  


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: व्यवसायात यशस्वी होण्यासाठी उद्योजक किशोर बियाणी यांच्या अडचणींची कथा वाचलीच पाहिजे
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी उद्योजक किशोर बियाणी यांच्या अडचणींची कथा वाचलीच पाहिजे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8zHe3cs5oadVARaYA9M8D1fNkSeVVyQjBaJeSmb1alTYPmcCu0gfcaUD4ccIbkTbz67zap_rxf-5VsAkzJqM3TgL3o89rCJNLOU7iNnJ3a246mX1yzMlmBcTkyqhyQY-BFCyjmmtJ5J6j/s320/%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A3%25E0%25A5%2580+%25E0%25A5%25A8.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8zHe3cs5oadVARaYA9M8D1fNkSeVVyQjBaJeSmb1alTYPmcCu0gfcaUD4ccIbkTbz67zap_rxf-5VsAkzJqM3TgL3o89rCJNLOU7iNnJ3a246mX1yzMlmBcTkyqhyQY-BFCyjmmtJ5J6j/s72-c/%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A3%25E0%25A5%2580+%25E0%25A5%25A8.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_66.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_66.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content