अहमदनगर : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला. या क्लिपमुळे ...
अहमदनगर : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. त्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटले आहे की, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली आणि मन सुन्न झालं ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’ असा जोरदार हल्ला करत त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1428645188663054337?s=20
आरोग्य विभागातील लिपिकाला मारहाण झाल्याचे प्रकरणही झाले होते. त्यावरही दबाव टाकून खुलाशाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याप्रकरणी त्यांनी आ. लंके यांच्यावर हल्ला चढविला आहे. मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असे निंदनीय प्रकार घडत आहेत. आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत या घटना घडत असताना स्री सबलीकरणाच्या बाता मारणारे काय भूमिका घेणार, हे पाहायचे आहे, असे म्हणत त्यांनी थेटपणे शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.
याप्रकरणी वातावरण चिघळले आहे. त्यामुळे शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
COMMENTS