मुंबई : सोने खरेदी करण्यासाठी सध्या चांगली संधी निर्माण झाली आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात सोने खरेदी करता येणार आहे. कारण, रिजर्व बँकेने ...
मुंबई :
सोने खरेदी करण्यासाठी सध्या चांगली संधी निर्माण झाली आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात सोने खरेदी करता येणार आहे. कारण, रिजर्व बँकेने 2020-21 या वर्षात सार्वभौम सुवर्ण रोखे अर्थात ‘सॉव्हरीन गोल्ड बॉंड’ विक्रीचे 16 टप्पे जारी केले आहेत. या योजनेचा पाचवा टप्पा आजपासून सुरू होत आहे.
या योजनेत सुवर्ण रोखे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. हे रोखे स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका वगळता अन्य सर्व कमर्शियल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टपाल कार्यालये, तसेच विविध ब्रोकिंग कंपन्या यांच्यामार्फत खरेदी करता येणार आहे. सध्या एक ग्रॅम आणि त्यापटीत गोल्ड बॉंड उपलब्ध आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात सरकार सहा टप्प्यात गोल्ड बॉंडची विक्री करणार आहे.
वैयक्तिक गुंतवणूकदारांना 1 ग्रॅमपासून त्यापटीत जास्तीत जास्त 4 किलो, एचयूएफ 4 किलो आणि अन्य संस्थांना 20 किलोपर्यंत गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करता येईल. यावर दरवर्षी साधारण 2.50 टक्के व्याज देण्यात येणार आहे. वार्षिक आणि अर्ध वार्षिक स्तरावर व्याज देण्यात येईल. या बॉंडची मुदत आठ वर्षे असून पाच वर्षानंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
जुलैपर्यंत या योजनेत केंद्र सरकारने 25 हजार 702 कोटी रुपये उभारले आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली होती. सन 2020-21 या वर्षात गोल्ड बॉंड योजनेचे विक्रीसाठी 16 टप्पे जारी केले आहेत. याद्वारे तब्बल 32.35 टन सोने विक्री झाली आहे. या योजनेत केंद्र सरकारला 16049 कोटी रुपये इतका घसघशीत महसूल मिळाला होता.
दरम्यान, सध्या सोने बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींचा देशांतर्गत सोने बाजारावर परिणाम होत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.
COMMENTS