Advt

advt top 2

आ. लंके – काळे यांच्या भेटीच्या वावड्या खोट्याच; पहा भेटी मागचे नेमके कारण काय

  गेल्या काही दिवसांपूर्वी आ. लंके - काळे भेट झाली होती.. प्रतिनिधी : अहमदनगर  आमदार नीलेश लंके आणि कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे या...

 

गेल्या काही दिवसांपूर्वी आ. लंके - काळे भेट झाली होती..

प्रतिनिधी : अहमदनगर 

आमदार नीलेश लंके आणि कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची नुकतीच एक भेट झाली होती. या भेटीने नगर-पारनेरसह जिल्हाभरात विविध चर्चा आणि तुर्क-वितर्कांना उधान सुटले. लंके समर्थकांनी तर थेट खा. सुजय विखे आणि आ. संग्राम जगताप यांच्या सहमती एक्स्प्रेसला रोखण्यासाठीची ही मोर्चेबांधणी असल्याचे जाहीर केले होते. याच आशयाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियातून फिरल्या. त्यावर अनेक वृत्तपत्रांनी बातम्याही केल्या. मात्र, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून या वावड्या खोट्या असल्याचे जाहीर करून ‘या’ चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात किरण काळे यांनी म्हटले आहे की, मी पारनेर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी गेलो असता माझ्या सहकाऱ्यां समवेत पारनेरचे आ.निलेश लंके यांची सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून सदिच्छा भेट होती. या भेटीबाबत अनेक राजकीय स्वरूपाची चर्चा समाज माध्यमांमधून आणि इतर व्यासपीठांवरून सुरू आहे. या भेटीचा विपर्यास यातून झाल्याचे दिसते. आ. लंके यांना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या. 

नगर शहरामध्ये काँग्रेसचे काम करत असताना जिल्हा युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हा समन्वयक या नात्याने नगर शहरासह पारनेर आणि सबंध जिल्ह्यामध्ये माझा संपर्क असतो. त्या निमित्ताने अनेक युवक कार्यकर्ते माझ्या संपर्कात असतात. त्या निमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी सातत्याने माझ्या सुरू असतात.  पारनेर, सुपा परिसरातील काही युवक कार्यकर्ते यांच्या निमंत्रणावरुन गेलो असताना आ.लंके हांग्यात असल्याचे समजले. यापूर्वी देखील आमच्या भेटी झाल्या आहेत. तशीच ही भेट होती. 

मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी घटक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी या सातत्याने होत असतात. मात्र या भेटीगाठींचा राजकीय विपर्यास करणे हे योग्य नाही. एकमेकाचा सत्कार करणे, यात काही गैर असण्याचे कारण नाही आणि याला राजकीय संदर्भ जोडण्याची देखील अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे आ.लंके यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा करण्याच्या संबंधच येत नाही असे काळे यांनी म्हटले आहे. 


माझी बांधिलकी समाजाशी....

 कुणाचे कुणाशी राजकीय मतभेद असतील तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकारणात या गोष्टी सुरू असतात. नगर शहरात काम करत असताना राजकीय संघर्ष करण्यासाठी मी, माझे सहकारी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सक्षम आहोत. नगर दक्षिणेत कुणाचे कुणाबरोबर काय चालू आहे यात आपल्याला रस नसून नगर शहरातील नागरी प्रश्नावर काम करण्याशी आमची बांधिलकी आहे. या भेटीचा निव्वळ राजकीय विपर्यास झाला असून या गोष्टीला मी फारसे महत्त्व देत नाही. इतर कोणी देखील ते देऊ नये, असे किरण काळे यांनी म्हटले आहे. 


मात्र, असा खुलासा करण्याची वेळ काळेंवर का आली असावी, हा आणखी नवा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.  


COMMENTS

Advt.

नाव

agriculure,10,Ahmednaga,2,Ahmednagar,105,akola,6,andolan,10,anticorruption,2,Aurangabad,21,bank,1,beed,4,bharat band,1,bjp,15,boar,1,budget,9,Business,7,caa,1,congress,12,covid,16,crime,13,Editorial,5,election,14,electricity,5,funnynews,2,goa,1,gold price,2,Gramvikas,18,GramvikasKokan,1,health,14,Interview,1,karjat,2,kisaan,13,Kokan,9,Kolhapur,17,Latest News,79,Lifestyle,13,lockdaun,4,lockdown,1,Mahapalika,9,Maharashtra,97,Mantralay,21,marrage,1,milk,1,mns,2,mpsc exam,2,Mumbai,59,Nagarpalika,1,Nagpur,17,Nashik,16,National,35,oil price,2,Panchayat Samiti,4,parner,14,pathardi,6,Politics,33,printing press,2,protest,5,Pune,27,rateshike,2,revenue,11,sc,1,Scheme,8,science,2,share market,7,shevgaon,3,shivsena,4,Solapur,2,Technology,5,tmc,1,urin infection,1,west bengal,1,World,1,ZP,14,
ltr
item
Rajyakarta: आ. लंके – काळे यांच्या भेटीच्या वावड्या खोट्याच; पहा भेटी मागचे नेमके कारण काय
आ. लंके – काळे यांच्या भेटीच्या वावड्या खोट्याच; पहा भेटी मागचे नेमके कारण काय
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgOHwxk1J7HAHQjw575sTqNT-DXMih0A7qP-NNmMjreAlTLdmE8ayLfyZ1As6w4ddRkng6NdLPZki-aY2S_OqQHyh9r7IjHX7KnO59YqnmkiE0NZLXLFb4p3UJ4coG3hc3-6r2LxmeBrov-/s320/%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A7.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgOHwxk1J7HAHQjw575sTqNT-DXMih0A7qP-NNmMjreAlTLdmE8ayLfyZ1As6w4ddRkng6NdLPZki-aY2S_OqQHyh9r7IjHX7KnO59YqnmkiE0NZLXLFb4p3UJ4coG3hc3-6r2LxmeBrov-/s72-c/%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A7.jpg
Rajyakarta
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_92.html
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/
https://www.rajyakarta.in/2021/08/blog-post_92.html
true
4384648381543011401
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content